कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कठोर धोरणामुळे खाटकांची पंचायत

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ :  लोकसंवादने सलग वृत्तमालिका लावून बेकायदा  गोवंश जनावरांची कत्तल कशी होते कोणा कोणाची भूमिका महत्वाची आहे. पोलीसांपेक्षा अधिक जबाबदारी कोणा कोणाची आहे. गोवंश जनावरे कत्तली पासुन कसे वाचवू शकतात याची जाणीव  लोकसंवादने दाखवून दिल्यानंतर कोपरगाव शहरात सध्या तरी गेल्या अनेक दिवसांपासून कत्तलखाने बंद झाले केवळ कत्तलखाने बंद झाले तर शेकडो जनावरांना जीवदान मिळाले त्यात गोवंश जनावरांचा सामावेश मोठा होता. 

लोकसंवादने कोपरगाव येथील जनावरांच्या बाजारातून चोरून गोवंश जनावरांची खरेदी विक्री खाटकी कसे करतात. बाजार समितीच्या डोळ्यात कशी धूळफेक करतात याची माहीती लोकसंवादने प्रसिद्ध केल्याबरोबर लगेच दुसऱ्या बाजारात त्याचा परिणाम जाणून आला. सोमवार दि. ३ फेब्रुवारी शहरातील बाजार समितीच्या आठवडे बाजारात जनावरांच्या खरेदीविक्री मोठा परिणाम झाला. बाजार समितीने लोकसंवादच्या बातमीची दखल घेवून दोन गेट ऐवजी एकाच गेटमधून जनावरांच्या गाड्यांची आवक जावक सुरु ठेवली. आलेल्या सर्व जनावरांवर बारकाईने लक्ष ठेवून नोंदणी केली.

खरेदी झाली तरी नाही झाली म्हणून परत घरी घेवून चाललोय म्हणणाऱ्यांची कसुन चौकशी सुरु केली. प्रत्येक पावतीची शहानिशा सुरु झाल्याचे जनावरे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या लक्षात आले त्यामुळे गोवंश जनावरांची कत्तल करुन गोमांस विकणाऱ्यांची मोठी पंचायत झाली. बाजारातून गोवंश जनावरे खरेदी करणे शक्य होणार नाही हे लक्षात येताच अनेक खाटकांनी बाजारातून काढता पाय घेतला. काही खाटकांनी  बाजाराकडे पाठ फिरवली. जो पर्यंत सध्याचे वातावरण शांत होणार नाही तोपर्यंत गोवंश जनावरे खरेदी करणे कठीण होणार हे काहींच्या लक्षात आल्यामुळे थांबुन घेणे पसंत केले.

कोपरगाव बाजार समितीच्या काही संचालकांसह कर्मचाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवून जनावरांची खरेदी विक्री सुरु करताच अनेक व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी केली नसल्याने ३ फेब्रुवारी सोमवारच्या बाजाराची उलाढाल मागच्या बाजार पेक्षा कमी झाली. मागच्या सोमवारी ९१ लाखांची उलाढाल झाली होती त्यात बाजार समितीला ९१ हजारांचा फायदा झाला होता. यावेळी ६८ लाख ७० हजारांची उलाढाल होवून ६८ हजार ७०० रुपयांचा नफा झाला. 

 एक संचिलकाने सांगितले की, या बाजारात खाटकांनी जनावरांची खरेदी केली नाही. ते आलेच नाहीत त्यामुळे खरेदीवर परिणाम झाला. त्यातच बाजार समितीने नियमांचे कडक पालन केल्याने त्याचाही बाजारावर परिणाम झाला. काही बॅंकांमार्फत जनावरांची खरेदी होते ती झाली नाही.  बाहेरगावचे व परराज्यातील काही व्यापारी आले नसल्याने या सोमवारच्या बाजाराची उलाढाल कमी झाली परंतु खाटीक व्यापारी बहुतांश आलेच नाही असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान कोपरगाव शहरातील संजयनगर, आयशा काॅलनी, हाजी मंगल कार्यालय परिसर या भागात वारंवार बेकायदा गोवंश जनावरांची कत्तल केली जाते काही ठराविक लोकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होत आहे. गोवंश जनावरांची कत्तल होणार नाही याची दक्षता कोपरगाव नगरपालिका, पशुवैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी घेतली आहे, आता कोपरगाव बाजार समितीने नियमांचे तंतोतंत पालक करीत गोवंश जनावरांची चोरुन खरेदी विक्री होणार नाही याची खबरदारी घेतल्याने कोपरगाव येथे आता गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांना चांगलाच घाम फुटला आहे.

बेकायदा जनावरे खरेदी करता येणार नाही. बेकायदा पशुवैद्यकीय अधिकारी यांचा दाखला घेता येणार नाही. बेकायदा कत्तलखाने चालवता येणार नाही. बेकायदा गोमांस विक्री करता येणार नाही. अगदी एखाद्याने गोमांस खरेदी करुन घेवुन जाताना दिसले तरीही त्यांच्यावर कारवाई होणार अशी व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केल्याने गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांची यातून सुटका होणार नाही.  लोकसंवादच्या वृत्ताची वरिष्ठ पातळीवर दखल घेवून स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्याने गोवंश जनावरांची सुरक्षितता अधिक वाढल्याने शेकडो जनावरांना जीवदान मिळाले आहे. 

Leave a Reply