कोपरगाव प्रतिनिधी दि. ५ : खुद पालकमंत्र्यांच्या लोणी येथील जनावरांच्या बाजारातून गोवंश जनावरांची खरेदी विक्री सुरु असुन चक्क खाटीकच चार गायी व एक बैल विना पावतीची खरेदी करुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांपासुन लपून छपून घेवून जात असताना कोपरगाव शहर पोलीसांच्या मदतीने उघड झाले.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2025/01/samata-ek-hajar-koti-e1735742640142.jpg)
लोकसंवादने बेकायदा कत्तलखाने व गोवंश जनावरांची बेसुमार कत्तल कशी होते. गोवंश जनावरांची खरेदी विक्री कशी केली जाते. बाजार समितीच्या डोळ्यात धुळफेक करीत खाटीक गोवंश जनावरे कसे घेवून जातात याची माहीती लोकसंवादच्या माध्यमातून नुकतीच उघड झाली.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sona-poly.png)
जनावरांच्या बाजारात होणारी खरेदी विक्री यावर लक्ष वेधत असताना मंगळवारी राहता तालुक्यातील लोणी येथील जनावरांच्या बाजारातून खुलताबाद जि. छञपती संभाजी नगर येथील सादीक कुरेशी याने नाही शक्कल लढवत थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावातून चक्क चार गायी व एक बैल विना पावतीचे खरेदी करुन कत्तल करण्यासाठी घेवुन जात असल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व कोपरगाव शहर पोलीसांच्या मदतीने उघड झाले.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sanjivani.png)
सादीक कुरेशी याने मंगळवारी गायी खरेदी करून बुधवारी मध्यराञी कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा वेळेत एमएच १५ जी व्ही ९१३७ या पिक अप मधून अंकुश देविदास जाधव व पवन कपूरचंद राजपूत दोघे राहणार बायगाव ता. वैजापूर जिल्हा छञपती संभाजीनगर हे समृद्ध महामार्गावरून खुलताबाद येथील देवगाव येथे घेवून जात असताना बजरंग दलाचे काही कार्यकर्ते यांनी कोपरगाव येथील समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावर संबंधीत गाडी अडवली असता गाडीचा चालक अंकुश जाधव याने उडवाउडवीचे उत्तर देत अरेरावी केली तसेच संबंधीत जनावरांची खरेदी केलेली पावती मागितली असता ती नव्हती.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2024/01/JYOTI-2024-e1704294196209.jpg)
आक्रमक झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व पोलीसांनी आपल्या खास शैलीत विचारांना केल्यानंतर चालक अंकुश जाधव याने सदरच्या गायी व बैल सादीक कुरेशी नावाचा खाटीक आहे त्याने लोणी येथे खरेदी केल्या असुन कोणालाही समजू नये यासाठी मुस्लीम ऐवजी हिंदू व्यक्तीच्या माध्यमातून कत्तल खान्या पर्यंत पोहच करण्याची व्यवस्था केली असल्याचे सांगितले.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/09/expert-1.jpg)
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या सतर्कतेमुळे गोवंश जनावरे पकडण्यात शहर पोलीसांना यश आले त्यामुळे चार गायी व एक बैल यांना जीवदान मिळाले. पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे शहर पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून अंकुश देविदास जाधव व पवन कपूरचंद राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना गजाआड केले. ८० हजार रुपयांच्या चार गायी, ३० हजार रुपयाचा बैल व ३ लाख रुपये किंमतीची पिक अप गाडीसह ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला तर गोवंश जनावरांची गोशाळूत मुक्तता केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2021/08/renuka-maltistate-scaled.jpg)
विशेष म्हणजे एम एच १५ जी व्ही ९१३७ याच गाडीतून हाच अंकुश जाधव गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेवून जाताना दोन महीण्यापुर्वीच सापडला होता. त्याच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा तोच सापडला. हाच गुन्हा तो कसा करतो पुन्हा पुन्हा. कोणाच्या बळावर करतोय पुन्हा हाच गुन्हा.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/07/contact-for-advt.jpg)
राज्यातील संपूर्ण जनावरांच्या बाजारावर बारकाईने लक्ष ठेवून जनावरांची खरेदी विक्री कशी होते. खाटीक कत्तलीसाठी गोवंश जनावरे कसे छुप्या पध्दतीने खरेदी करतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कोपरगाव बाजार समितीने एका दिवसात चाप बसवून चोरून जनावरांची खरेदी विक्री करणारे गायब केले. तोच आदर्श इतर बाजार समितीने घेतला पाहीजे.