एसएसजीएम महाविद्यालयात अँटी रॅगिंग जागृती सप्ताहाची सांगता

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात शासन निर्देशानुसार दि. १२ ते १८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत’ अँटी रॅगिंग जागृती सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा प्रारंभ डॉ. वैशाली सुपेकर यांच्या मार्गदर्शन व्याख्यानाने करण्यात आला. त्यानंतर माहितीपट दर्शन, पोस्टर प्रेसेंटेशन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, जागृतीपर कार्यशाळा इ. उपक्रम घेण्यात आले. डॉ. वैशाली सुपेकर यांनी आपल्या व्याख्यानातून अँटी रॅगिंगची संकल्पना, स्वरुप त्यासंबंधीचे कायदे, शिक्षेची तरतूद अशा विविध बाबीची माहिती दिली.

त्यानंतर झालेल्या रांगोळी, पोस्टर प्रेसेंटेशन, निबंध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या विचार कल्पनांचा आविष्कार घडविला. या सप्ताहाचा समारोप ‘अँटी रॅगिंग जागृतीपर कार्यशाळेने’ करण्यात आला. या कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करताना कोपरगाव शहराचे पी.आय. वासुदेव देसले यांनी रॅगिंगचे दुष्परिणाम, होणारी शिक्षा, विद्यार्थी करिअर याबद्दल सविस्तर सांगून विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. या सर्व कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांनी आपल्या अनुभवातील उदाहरणे सांगून रॅगिंग ही छोट्या चुकीतून घडणारी भयंकर शिक्षा देणारी कृती कशी आहे, हे पटवून दिले. तसेच या विकृतीला आपल्या मनात थारा न देता विद्यार्थ्यांनी सहकाराची व समन्वयाची भूमिका बजावावी, असे आवाहन केले. सदर सप्ताहाचे आयोजन ‘अँटी रॅगिंग जागृती समिती’ प्रमुख डॉ. माधव यशवंत यांनी केले होते. तर या अंतर्गत झालेल्या विविध उपक्रमांसाठी प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. सीमा चव्हाण, योगेश आहेर, डॉ. विशाल पवार, प्रा. डॉ.उज्ज्वला भोर, प्रा.महेश दिघे, प्रा. रावसाहेब दहे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर प्रा. डॉ. मोहन सांगळे, डॉ. सुनील काकडे, प्रा. श्रीमती कलावती देशमुख यांनी विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून कार्य केले.

‘अँटी रॅगिंग जागृती’ सप्ताहातील रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अँड संदीप वर्पे व श्री. सुनिल गंगुले यांच्या शुभहस्ते झाले व त्यांनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या सप्ताहातील विविध स्पर्धामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम- बनकर आस्था सुनील, द्वितीय- वाबळे श्रुती बाळासाहेब, तृतीय- गोरे ईश्वरी अनिल, उत्तेजनार्थ- आहेर निकिता जालिंदर व पठाण निदान इसारखान,

रांगोळी स्पर्धेत प्रथम- बाविस्कर आरती, द्वितीय- मोहिते ऋतुजा व रसाळ दिव्या, तृतीय- वाघ पायल व कोते अनिकेत व उत्तेजनार्थ दुबे अंजली, लांडे चेतना, चव्हाण गौरी, चव्हाण अश्विनी, शिंगाडे विशाखा, खुरुडे अंकिता इ. पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये प्रथम- देशमुख अनुष्का, भागवत ज्ञानेश्वर, द्वितीय- जोशी अनघा राजेश, तृतीय- सलालकर ऋतुजा, तावडे हर्षदा व उत्तेजनार्थ- टेके विद्या इ. विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सदर सप्ताह प्राध्यापकांची सक्रिय उपस्थिती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व हिरीरीने सहभाग यामुळे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सप्ताह काळात महाविद्यालयातील माहोलच बदलून गेला होता.