सोलापूरकराच्या वक्तव्याचा निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : भाजपने गैर मार्गाने केंद्रात व राज्यात बहुमत मिळविले आहे. सत्तेचा उन्माद म्हणून आरएसएस व भाजपचे लोक इतिहास मोडतोड करून ऐतिहासिक महापुरुषांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल सोलापूरकर या नटाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आग्र्याहून सुटका करण्यासाठी महाराजांनी लाच दिली होती असे अत्यंत बदनामीकारक व आक्षेपार्ह विधान केले असल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी केली.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व लोकशाहीवादी परिवर्तनवादी चळवळीच्या वतीने आज गुरुवारी  सकाळी येथील क्रान्ती चौकात सोलापूरकराच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या निषेध सभेत ॲड. लांडे  बोलत होते. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत सोलापूरकरांचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी  कॉ. संजय नांगरे, कॉ. बबनराव पवार, कॉ. भगवानराव गायकवाड, राम लांडे, राम डाके, आयुब आतार, जावेद बागवान, राज गायकवाड, विजय मगर, नितीन मगर, राजु दुसंग, ईश्वर मगर, संतोष पटवेकर, हरिभाऊ साळवे, शहादेव निळ आदी प्रमुख उपस्थित होते. 

Leave a Reply