फ्लेक्स विटंबना प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याला सहआरोपी करा – रणुशर 

फ्लेक्स विटंबना प्रकरणी आमरण उपोषण सुरु

 कोपरगाव प्रतिनिधी दि. ११ : कोपरगाव शहरात शनिवारी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा फ्लेक्सची विटंबना केली होती.  त्या प्रकरणी पोलीसांनी एका वेड्याला अटक केली. माञ पोलीसांनी मुख्य सुञधाराला पाठीशी घालुन एका वेड्याला अटक करीत समस्त आंबेडकर प्रेमींना वेड्यात काढले आहे. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना यामध्ये सहआरोपी करावे अशी मागणी आरपीआयचे नेते जितेंद्र रणशुर यांनी केली. 

कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने भंन्ते कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र रणशुर, विजय ञिभूवन व प्रकाश दुशिंग यांनी फ्लेक्स विटंबनेच्या घटनेतील मुख्य आरोपीला त्वरीत पकडण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दर्शविला आहे.

यावेळी समाजातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते महीला यांनी उपोषणस्थळी भेट देवून झालेल्या घटनेचा व पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर  संशय व्यक्त केला. यावेळी बोलताना रणशुर म्हणाले की, पोलीसांनी जो मनोरुग्ण पकडला आहे. तो आम्हाला मान्य नाही किंबहुना संबंधीत मनोरुग्णाकडू हे कृत्य होवू शकत नाही.

उलट ज्यांनी फ्लेक्सची विटंबना केली त्या आरोपीला पोलीस अधिकारी पाठीशी घालत आहेत. तेव्हा या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देवून पोलीस अधिकाऱ्याला सहआरोपी करावे, फ्लेक्सची विटंबना झालेल्या काळातील मोबाईलचा सीडीआर तपासावे. असे म्हणत रणशुर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले.

यावेळी भंन्ते कश्यप म्हणाले की, फ्लेक्सची विटंबना झालेल्या दिवशी संपूर्ण आंबेडकर प्रेमी समाज आक्रमक झाला होता. रास्ता रोको करीत ठिय्या मांडून बसला होता. आपण पोलीस प्रशासनाला तपासाठी वेळ मिळावा म्हणून समाज बांधवांची समजूत काढुन मी आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले, पण पोलीसांनी मुख्या आरोपीला न पकडता एका वेड्याला पकडून माध्यमांना चुकीची माहीती दिली.

वेडा माणुस फक्त आमच्या समाजाचे फ्लेक्स कसा फाडतोय. इतर का फाडत  नाही. जोपर्यंत मुख्य आरोपी पोलीस पकडत नाहीत तोपर्यंत माझं आंदोलन सुरुच राहील असे म्हणत पोलीस प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली. यावेळी उपोषणकर्ते विजय ञिभूवन, प्रकाश दुशिंग यांनीही झालेल्या घटनेचा निषेध करीत पोलीसांनी पकडलेला आरोपी अमान्य असल्याचे सांगितले.

या उपोषणाला  उध्दव ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, आरपीआयचे दिपक गायकवाड, वर्षा शिंगाडे, शरद खरात, संदीप पगारे, प्रफुल्ल शिंगाडे, संजय कांबळे, खिवराज दुशिंग, नवाज कुरेशी यांच्यासह अनेकांनी उपोषण स्थळी भेटी देऊन झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.

Leave a Reply