सायकलीग स्पर्धेत आमदार मोनिका राजळे सहभागी 

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ :  भारतीय जनता युवा मोर्चा शेवगाव पाथर्डी तालुका व नमो चषक २०१४ भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवा अतर्गत मंगळवारी आयोजित शेवगाव ते अमरापूर या दहा किलोमिटर अंतराच्या सायकलीग स्पर्धेत आमदार मोनिका राजळे यांनी ट्रॅकसूट घालून स्वतः स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले.

Mypage

 शहरातील संत गाडगे बाबा चौकातून पहाटे सहाला या स्पर्धेला सुरवात झाली. ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, सरचिटणीस भिमराज सागडे, भाजपा युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, महादेव पवार, आदि प्रमुख कार्यकर्त्यांनी हिरवा झेंडा दाखवून हवेत फुगे सोडून स्पर्धेला सुरवात केली.

Mypage

स्पर्धेत शेवगाव सायकल क्लबचे अध्यक्ष विनोद ठाणगे, रोटरीचे माजी अध्यक्ष भागनाथ काटे, डॉ. प्रदीप व डॉ. स्मिता उगले व डॉ. कृष्णा व डॉ.शिल्पा देहाडराय हे पतिपत्नी, डॉ. संदिप बोडखे, डॉ. दीपक वैद्य, डॉ. योगेश फुंदे, निळकंठ लबडे, आदिसह ३५ विविध शैक्षणिक संस्थातील सायकल पटू सहभागी झाले होते.

Mypage

तालुक्यातील बालम टाकळी येथे देखील अशीच स्पर्धा घेण्यात आली. यावेळी भाजपाचे नेते कासम शेख, संदीप देशमुख, भाऊसाहेब मुरकुटे, सुरेश नेमाणे, नारायण मडके, अंबादास ढाकणे यांचे सह स्पर्धक उपस्थित होते. 

Mypage