संकटाला हिंमतीने सामोरे जात त्यावर मात करू – बिपिन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ :  येणारा काळ कठीण आहे, दुष्काळाचे संकट मोठे आहे, उस उत्पादक सभासद, शेतकरी, कामगार आणि व्यवस्थापन एकमेकांच्या सहकार्याने हिंमतीने त्याला सामोरे जाऊन त्यावर मात करत लक्ष्मीची छत्रछाया सर्वांना मिळावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे लक्ष्मीपूजन सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवारी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या काटकसरीच्या शिकवणुकीतून आपला कारखाना मार्गक्रमण करत आहे.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली यंदाचे गाळपाचे सर्व उद्‌दीष्ट पूर्ण करू असे ते म्हणाले. उपाध्यक्ष मनेष गाडे, सर्व संचालक, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते रोखपाल डी. डी. बोरनारे, आर. टी. गवारे, एस. जी. चव्हाण, एम. के. आभाळे, के. डी. रक्ताटे यांना दीपावली निमित्त बक्षीस देण्यात येऊन भाजपाचे नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांचा सत्कार करण्यात आला.

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला संकटे नवीन नाही. संकटावर मात करत ६१ व्या गळीत हंगामाची यशस्वी सुरुवात केली असून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण सदैव पाठीशी आहे. चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यांने उस पिकांसह, अन्य सर्वच कृषी उत्पादनांत घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळसण साजरा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पाटपाण्यासाठी कोल्हे कारखाना सर्वोच्च न्यायालयात उर्ध्व गोदावरी खो-यातील पाटपाण्याचा संघर्ष कायम आहे, कमी पाणी असल्याने वरच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडून त्याचा अपव्यय होणार आहे. त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालय नवीदिल्ली येथे याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होत आहे असे बिपीन कोल्हे म्हणाले.

कोपरगाव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे लक्ष्मीपूजन रविवारी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी त्यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.

कारखान्याने आधुनिकीकरणाची कास धरत प्रति दिवस दैनदिन गाळप क्षमता ६ हजार मे टन केली आहे. बचत ही भविष्यकाळाची मोठी साथ आहे. खर्च कमी करा, खोडवा/दूरी, उस उत्पादन वाढवा, पाचट अच्छादन करा, पाण्यांच्या बचतीसाठी शेततळी वाढवा, दर्जेदार अधिक उत्पादन देणाऱ्या उस बेण्याचा वापर करून ठिबकसिंचनाची साथ घ्या, भावनांना आवर घाला, शुभविवाह, साखरपुडे, समारंभ आदी कमी खर्चात थोडक्यात साजरे करा, चुकीच्या दिशेला जाऊ नका, जून्या सवयींना लगाम घाला, बचत करा तरच लक्ष्मी स्थिर राहील, येणाऱ्या कठीण काळात आपली साथ महत्त्वाची असणार आहे असेही ते म्हणाले. 

याप्रसंगी संचालक विश्वास महाले, ज्ञानेश्वर परजणे, विलास वाबळे, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, सतिष आव्हाड, तुळशीराम माळी, रमेश घोडेराव, त्र्यंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, शिवाजी वक्ते, बाळासाहेब संधान, संजय होन, सोपान पानगव्हाणे, फकिर बोरनारे, प्रदिप नवले, विजय आढाव, शरद थोरात, यांच्यासह संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, माजी संचालक, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कार्यकर्ते, कामगार आदी उपस्थीत होते. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिव तुळशीराम कानवडे यांनी केले.