शिर्डी परीसरात बनावट देशी दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई

कोपरगाव  प्रतिनिधी दि. १४ : कोपरगाव व शिर्डी परीसरात बनावट देशी दारु विक्री करणा-यावर राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाने धडक कारवाई करत दोन जणांविरुद्ध कारवाई केली असून एकाला ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ११ ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, वावी, राहाता रोड, वेसगांव शिवार, कोपरगाव या ठिकाणी हॉटेल जय मल्हारमध्ये बनावट देशी दारूची विक्री केली जात आहे. यावेळी दारुबंदी गुन्हयाखाली छापा टाकला. आरोपी जालिंदर गोरक्षनाथ चितळकर रा. सोयगांव, कोपरगाव या इसमाकडे अवैद्य देशी व विदेशी मद्य मिळून आले. मिळुन आलेल्या देशी दारू १८० मिली क्षमतेच्या बाटल्या बनावट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विदेशी दारुचे १५ बॉक्स व देशी दारु भिंगरी संत्राच्या १८० मिली क्षमतेच्या ४ बॉक्स तसेच एक मोबाईल असे एकुण ४९२२०/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदर बनावट देशी मद्याबाबत तपास केला असता भाऊसाहेब साहेबराव जगताप याचेकडुन प्राप्त झाले असे समजले. अटक आरोपी व फरार आरोपी भाउसाहेब साहेबराव जगताप विरुध्द महाराष्ट्र दारुबंधी कायदा १९४९ चे कलमान्वये गुन्हानोंद करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बनावट देशी दारु उपलब्द करुन ढाबे व टपऱ्यावरती विक्री करणारा मुख्य सुत्रधार भाउसाहेब साहेबराव जगताप हा फरार आहे. त्याचा शोध राज्य उत्पादन शुल्क, कोपरगाव विभाग व भरारी पथक श्रीरामपुर द्वारे घेण्यात येत आहेत. शिर्डी व शिर्डी परीसरातील सर्व नागरीकांना राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत निवेदन करण्यात येते की, भाऊसाहेब साहेबराव जगताप हा इसम शिर्डी व शिर्डी परीसरात बनावट देशी दारुची विक्री करत आहे.

नागरीकांनी मद्य खेरेदी करताना शासन मान्य दारु दुकानामधुनच खेरेदी करावे. जेणेकरुन बनावट मद्य प्राशन करुन जिवित हानी होणार नाही व बनावट मद्यविक्रीला आळा बसेल. दरम्यान गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरिक्षक एस. पी. जाधव करीत आहे.

सदरची धडाकेबाज कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने, उपाधीक्षक सुजीत पाटील, कोपरगाव निरिक्षक एस.एस. हांडे, निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. आर. शेलार, जी. एन. नायकोडी दुय्यम निरिक्षक, व्ही. एम. आभाळे, सहादु भाउसाहेब भोर, खलील शेख, नारायण ठुबे, सुधीर नागरे, तसेच सचिन बटूळे, अमीन सय्यद, वर्षा जाधव, वाहन चालक विजय पाटोळे यांच्या पथकाने केली आहे.