माधवराव कुलकर्णी यांचे निधन

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : भाविनिमगाव येथील जेष्ठ कार्यकर्ते, प्रगतीशील शेतकरी माधवराव शंकरराव कुलकर्णी (वय ८८)  यांचे शनिवारी (दि.१२) सायं. ७. ४५ वा. वृद्धापकालाने निधन झाले. कै. माधवराव लोकनेते स्व. मारुती घुले यांचे विश्वासू सहकारी होते.

भाविनिमगाव ग्रामपंचायतीचे तब्बल ४० वर्षे सरपंच पद त्यांनी उत्तमरित्या सांभाळले. ते हाडाचे शेतकरी होते. राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांचे हस्ते त्यांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांचे मागे पत्नी श्रीमती मालती, नगरच्या मार्क कन्स्ट्रक्शनच प्रवर्तक मकरंद कुलकर्णी, ज्ञानेश्वरचे माजी संचालक मिलिंद नाना कुलकर्णी, इरिगेशन अभियंता महेश कुलकर्णी ही तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

रविवारी सकाळी त्यांचे पार्थिवावर चिंचबनात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, ह.भ.प अशोक बोरुडे महाराज, ह.भ.प. मुकुंद अंचवले महाराज, डॉ. अरुण पवार, डॉ. संदिप जरे, शिवाजी गवळी, बाळासाहेब धोंडे, राजाभाऊ पाऊलबुद्धे, सुधीर जोशी आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शामराव भारदे, प्रकाश जोशी, हरिष भारदे, अशोकराव कुलकर्णी यांचेसह नातेवाईक व पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ReplyReply allForward