रेणुका गांगुर्डे यांच्या वारसास जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मदतीचा हात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुती आलेल्या या महिलेस वेळेत उपचार न मिळाल्याने प्रसुती नंतर अती रक्त स्रावामुळे रेणुका गांगुर्डे या महिलेचा मु्त्यु झाल्याने आरोग्य विभागाच्या बेजबाबदार वृत्तीचे महाराष्ट्र भर पडसाद उमटले. रेणुका यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी अहमदनगर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी राजेंद्र वाघमारे यांनी सहकार्यासह गांगुर्डे कुटुंबियांची भेट घेत चिमुकलीच्या नावे फिक्स डिपाँझिटची पावती स्वाधीन करण्याचे अभिवचन दिले.

राजेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नितीनराव शिंदे रेवनाथ देशमुख शोभा पातारे अशोकराव माळी रोहिदास चव्हाण, बंटी यादव, चंद्रकांत बागुल, संदिप मोरे, मनोज बिडवे, सोपान धेनक, कैलास धेनक आदीसह अहमदनगर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांनी गांगुर्डे कुटुंबीयांची भेट घेत सर्व हकिकत जाणुन घेतली.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा नंतरही आदिवासी समाजास मुलभूत प्रश्नांसाठी लढा द्यावा लागतोय हि चिंतेची बाब असुन शासन आपल्या दारी या उपक्रमात आदिवासी कुठे आहे ? असा प्रश्न उपस्थित करत रेणुकाच्या चिमुकलीच्या पालनपोषणाची सर्वस्वी जबाबदारी शासनाने उचलून मुख्यमंत्री निधी अंतर्गत गांगुर्डे कुटुंबास तात्काळ मदत देण्याची मागणी केली. अशोकराव माळी, बंटी यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गांगुर्डे कुंटुबिंयाकडुन कागदपत्रे घेवून चिमुकलीच्या नावे फिक्स डिपाँझिट करण्याचे अभिवचन काँग्रेस पदाधिकारी यांनी देताच वाघ कुटुंबीयांच्या डोळ्यात मुलीच्या विरहाने अश्रु उतरले. जिल्हा आरोग्य व्यवस्थापनाने वैद्यकीय कारभारात सुधारणा करुन भविष्यात रेणुका गांगुर्डे सारखा दुर्दैवी मृत्यू कोणाचाही होणार नाही, याकडे अहमदनगर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी राजेंद्र वाघमारे यांनी लक्ष वेधले.