विजयादशमीला कोल्हे कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ६० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिन समारंभ संचालक विलासराव तुळशीराम माळी व सौ. रंजनाताई विलासराव माळी या उभयतांच्या हस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Mypage

बुधवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता होत असल्याची माहिती उपाध्यक्ष रमेश घोडेराव, व सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी दिली. तरी सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी या बॉयलर पुजेच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यांत आले आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *