संवत्सर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुक्यातील संवत्सर  येथील  क्रांतिसूर्य  महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळाच्या वतीने नुकतीच सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  कोपरगाव औधोगिक वसाहतीचे
संचालक  व वाचनाल्याचे अध्यक्ष  पंडित भारूड यांचे हस्ते महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले.

Mypage

यावेळी राज्यामध्ये महापुरुषाच्या  विचारांचा  प्रचार व प्रसार केला पाहिजे. परंतु असे न होता महापुरुषाचा सातत्याने अवमान केला जातो. हे सर्वानी टाळले पाहिजे नाहीतर एक दिवस संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
महापुरुषापेक्षा कोणीही मोठा नाही. याची जाणीवपूर्वक काळजी सर्वानीच घ्यावी असे भारूड यांनी आपल्या भाषणात  सांगितले.

Mypage

यावेळी  चांगदेव माईंड, विजय काकडे, कुंदा भारूड, बाळू माईंड, सम्यक भारूड आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार चांगदेव माईंड यांनी मानले.

Mypage