विद्युत कर्मचारी संप मागे घेतल्याने शेवगावात सुटकेचा निश्वास

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये या व  इतर प्रमुख मगण्याच्या पाठ पूराव्यासाठी काल मंगळवारी ( दि.३ ) मध्यरात्री पासून ७२ तासांचा संप पुकारला होता. या संपात तालुक्यातील १३६ अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.

शेवगाव शहरात आज बुधवारी ( दि. ४ ) सकाळी साडे नाऊच्या सुमारास बत्ती गुल झाली. त्या नंतर तालुक्याच्या ग्रामीण परीसरात देखील टप्या टप्याने वीज पुरवठा खंडीत झाली. त्यामुळे विविध क्षेत्राची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार असल्याने अनेक जण घाबरले होते. विविध छोटे व्यवसायीक, पाणी पुरवठा, पिठाच्या गिरण्या तसेच विजेवर अवलंबून असलेल्या अनेकांनी या संपाची धास्ती घेतली. 

मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत विविध कामगार संघटनाचे पदाधिकारी तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे कामगार संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली व त्या नंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास शहरातील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला मात्र त्या नंतरही विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास बराच वेळ लागला.