छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचे कामाला सुरवात

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : शेवगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम जोमात सुरू असून, त्याचा शिलान्यासाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. शिव स्मारक समितीच्या वतीने लोकसहभागातून हे काम करण्यात येत असून नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याच्या मागे सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

Mypage

या किल्ल्याला संपूर्णपणे काळा दगड लावण्यात येणार आहे. त्यातून किल्ल्याच्या वास्तवाचा अभास निर्माण होण्यासाठी या किल्ल्याच्या दगडी कामाचा शुभारंभ येथील वडार समाज, समस्त वाणी समाज, व समस्त कासार समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला. चंद्रकांत मोहिते देवा यांनी विधीवत शीला न्यासाची पूजा बांधली.  

tml> Mypage

यावेळी अशोक पाथरकर, सोमनाथ सुपारे, ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर. राजाराम कुसळकर, महेंद्र भाडाईत, संतोष हुंडेकरी, गणेश भाडाईत  यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. तीनही समाजाचे समाजबांधव आवर्जून उपस्थित होते. संयोजन समितीचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघ चालक जगदीश धुत यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.

Mypage

पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक हरीश शिंदे. ज्येष्ठ नेते सुनील रासने, कासार समाजाचे कांता काटकर व गणेश पाथरकर, वडार समाजाचे, बापू धनवडे, अंकुश कुसळकर, दिलीप सुपारे, अशोक धनवडे, वाणी समाजाचे आनंद जगदाळे, मेजर अनिल भाडाईत, राजेंद्र जगनाडे व राम गोलांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Mypage

स्मारक समितीचे अध्यक्ष नीरज लांडे, सचिव नितीन मालानी, कृष्णा देहाडराय, दत्तात्रय फुंदे, प्रितम गर्जे, अमोल घोलप, निलेश बोरुडे, विनोद ठाणगे, अमोल माने, बाळासाहेब देशपांडे, अभिजीत आव्हाड, विक्रम दारकुंडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बाप्पू धनवडे यांनी, स्मारकाच्या कामासाठी ५१ गोण्या सिमेंट व ग्रामदैवत शनि मारुती मंदिरासाठी ५१ गोण्या सिमेंट अरुण मुंडे यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश तसेच, माजी नगराध्यक्ष विनोद मोहिते यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश स्मारक समितीकडे सुपूर्द केला.

Mypage

येत्या डिसेंबर अखेर शिव स्मारकाचे काम पूर्ण होऊन शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या कामाचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर होईल, या दृष्टीने वेगाने काम करण्याचा मनोदय स्मारक समितीच्या वतीने लांडे यांनी जाहीर केला. परीक्षाविधीन पोलीस अधीक्षक, बी चंद्रकांत रेड्डी यांचा शिव स्मारक समितीच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला. चंद्रकांत महाराज लबडे यांनी आभार मानले.

Mypage