शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : घोटणच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदी परवीन पिरमंहमद शेख यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत संजय टाकळकर यांनी परवीन शेख यांच्या नावाची सूचना मांडली.
त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सेवा संस्थेचे चेअरमन लक्ष्मणराव टाकळकर यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
केदारेश्वरचे माजी संचालक मदन मोटकर व मधुकरराव गोरे, साहेबराव ज्योतिक, कल्याण विघ्ने, डेव्हीड गंगावणे, अनिल शेळके, तुकाराम थोरवे, राजेंद्र दौलत घुगे, ज्ञानेश्वर कुलट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक भोसले मेजर, दादासाहेब ज्योतीक, कारभारी थोरात, राजेंद्र चव्हाण, बबन खेडकर, उत्तमराव मोटकर, अशोकराव मोटकर आदिची उपस्थिती होती.