स्नेहलता कोल्हे यांनी द्वारकामाई वृद्धाश्रमात भेट देऊन साजरी केली दिवाळी

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : स्नेहलता कोल्हे यांनी द्वारकामाई वृध्दाश्रम शिर्डी येथे भेट देऊन वृध्द निराधारांसमवेत दिपावली साजरी केली आहे. एकीकडे झगमगाट असणाऱ्या दुनियेत कौटुंबिक ओलव्याचा प्रकाश धूसर झाल्याचे चित्र असताना मात्र, ज्येष्ठ नागरीकांना वेळ देऊन स्नेहलता कोल्हे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Mypage

ज्येष्ठ लोककलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या दुर्लक्षित आयुष्याला आधार देण्याच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या द्वारकामाई वृद्धाश्रमात कोल्हे यांच्या अनेकदा सदिच्छा भेटी होत असतात. या प्रसंगी संवाद साधताना त्या म्हणाल्या साईबाबांच्या आशीर्वादाची भूमी असणाऱ्या शिर्डीचे पवित्र स्थान तुमच्या जीवनात सुखाचे क्षण देणारे आहे. ही वाटचाल आनंद आणि सबुरीने सुरू ठेवावी व चिंतामुक्त जीवन जगावे.

Mypage

तुम्ही खचून जाऊ नका हे आश्रम आणि व्यवस्थापन तुमच्या जिवनात कसलीही उणीव भासू देणारे नाही. अतिशय उत्तम सुविधा आणि सेवा मिळतात त्यामुळे वृध्दाश्रम न मानता हे एक कुटुंब आहे असे वातावरण आहे.

Mypage

धावपळीच्या युगात कुणी कुणासाठी थांबण्यास तयार नसताना अशा काळात स्नेहलता कोल्हे यांनी निराधार नागरीकांसमवेत वेळ घालवून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संवेदनशील व्यक्तींसमोर आदर्श ठेवला आहे.

अनेक चढ उतार तुमच्या आयुष्यात आले असतील, कुणी काय वागणूक दिल्या असतील त्या क्षणाना विसरून जाऊन नव्याने इथे आनंदी रहा. मानसिक आरोग्य चांगले तर जीवन प्रफुल्लित राहते. मन खंबीर तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे एकटेपणा न बाळगता कुटुंब समजून रहावे. मलाही आपली माझ्या परीने तुमची काही सेवा करण्यासाठी खारीचा वाटा उचलता आला. तो मी भाग्य समजेल.

Mypage

श्री निवास व सुधा हे सधन कुटुंबातील सदस्य असून त्यांच्या हातून तुमची होणारी सेवा ही देवाचे निश्चित आहे. पवित्र साईनगरीत तुमचे जीवन समाधानात जात आहे. त्यामागे ईश्वरीय ताकद आहे. सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे होतात हे द्वारकामाई वृध्दाश्रमाचे वेगळेपण उल्लेखनीय आहे.

Mypage

माझ्या जीवनात देखील बालपणापाूनच वयोवृध्द आजी आजोबांची सेवा करण्याची सवय असल्याने कुठेही वयस्कर गृहस्थ दिसतात. ते मला कुटुंबाच्या सदस्या इतकेच आपुलकीचे वाटतात. ज्येष्ठांचे आशीर्वाद हीच खरी पाठीशी असणारी ताकद आहे. दिपावलीचा प्रकाश तुमच्या जिवनात सुख समृध्दी घेऊन येवो आणि उत्तम आरोग्य तुम्हाला लाभावे अशी प्रार्थना कोल्हे यांनी वृद्धाश्रमात मनोगत व्यक्त करताना केली.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *