शेवगांव तालुक्यातील अतिक्रमण हटाव माहीमे विरोधात उपोषणाचा दुसरा दिवस

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८: शेवगावातील टपरी धारकांना व्यवसायासाठी तात्काळ पर्यायी जागा देण्यात यावी. तसेच जायकवाडी धरणामध्ये विस्थापित झालेल्या गावांमधील अतिक्रमण काढण्यासाठी स्थगिती देण्यात यावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या गाडेकर यांनी येथील तहसील कार्यालया समोर बेमुदत
उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आजचा दूसरा दिवस आहे.

शासनाने अतिक्रमण हटवल्याने टपरी धारकांवर उपासमारीची वेळ आली असून त्या टपरी धारकांना तत्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच जायकवाडी धरणामध्ये विस्थापित झालेल्या गावांमध्ये ही शासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. तशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्या पुनर्वसीत गावांना अतिक्रमणा मधून स्थगिती घेण्यात यावी. अशी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या गाडेकर यांची मागणी आहे.

गाडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटली आहे की, शेवगाव तालुक्यातील खानापूर, नवीन दहिफळ, एरंडगाव, दहिगाव ने, बोडखे, खुंटेफळ आदी पुनर्वसित गावातील शेतकरी, व्यावसायिक हे एकदा जायकवाडीच्या निर्मितीमुळे बेघर विस्थापित झालेले आहेत. आता कुठे ते स्थिरस्थावर होऊन पोटापाण्याला लागले आहेत. अशावेळी त्यांना पुन्हा रस्त्यावर फेकण्याचे पाप अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे घडणार आहे. त्यामुळे या गावातील अतिक्रमण हटाव मोहिमेस स्थगिती मिळायला हवी.

निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेसह स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ॲड. सुभाष पाटील लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, संतोष गायकवाड, मच्छिंद्र आरले, जे व्ही देशमुख, वैशाली बल्लाळ, श्रावण सोनवणे, अभिषेक जगताप यांचेसह विस्थापित गावातील नागरिकउपस्थित होते.

आज दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या रास्त मागणीची दखल घेतली नाही म्हणून उपोषणस्थळी त्यावर आधारित गाण्यांचे  वाद्य संगित लावून संगित रजनीचे आयोजित केले. त्यामुळे उपोषणकर्त्याबरोबर उपस्थित नागरिकांची करमणूक ही झाली. 

Leave a Reply