सावित्रीबाई फुले मुळे महिला दिनाला महत्व – संगीता गोल्हार

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ :  तालुक्यातील हातगाव येथे अनेक महिला बचत गटाच्या मार्गदर्शक पद्मा निलेश मंत्री यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

          यावेळी  प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याधिपीका संगीता गोल्हार म्हणाल्या, महात्मा फुले यांनी त्या काळी स्त्रिया निरक्षर असताना त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना अगोदर स्वतः शिक्षणाचे धडे दिले व त्यानंतर त्यांनी सावित्रीबाईंना इतर स्त्रियांना साक्षर बनवण्यासाठी पुढे येण्यास सांगितले त्या सावित्रीबाईंनी देखिल टीका कारांची पर्वा न करता स्त्रीयांना  शिक्षण देण्याचे महान कार्य केले. त्यामुळेच सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणाच्या जनक म्हणून संबोधले जाते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा पद्मा मंत्री यांनी महिलाचे आर्थिक क्षेत्रातील योगदान व महिला दिनाचे महत्व विषद केले.

या कार्यक्रमांस अंगणवाडी सेविका बेबीताई  निकाळजे, उषाताई भराट, आशाबी पठाण, सुरेखा गाढे, स्वाती जऱ्हाड, उज्वला परदेशी, लताबाई अभंग, कविता घरवाढवे, आशावर्कर प्रेरणा निकाळजे, सोनाली कंठाळे यांचरसह अनेक महिला तसेच सरपंच अरुण मातंग, ग्रामसेवक संजय दारुणकर, ग्रा. प. सदस्य भाऊसाहेब मुरकुटे, दिलीप आंबेकर, गोरख कदम आदी उपस्थित होते. बेबीताई निकाळजे यांनी आभार मानले.