अतिक्रमणात काढतांना भिंत अंगावर पडून एकचा मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि.२० : येथील बस स्थानकासमोर अतिक्रमणात येत असलेली भिंत पाडत असताना भिंतीच्या आडोश्याला बसलेल्या इसमाचा भिंत अंगावर  पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही स्वरूपाची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

पोलीस यंत्रणेने दिलेल्या माहिती नुसार, बस स्थानकाच्या समोरील एक व्यायसायिक त्याचे अतिक्रमण जेसीबी यंत्राच्या सहाय्याने काढीत असतांना सदर इसम भिंतीच्या आडोश्याला येऊन बसला होता. यावेळी भिंत पडून त्याचा मृत्यू झाला. त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले आहे. सदर इसमाची ओळख अद्याप पटली नसून, त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत.  

Leave a Reply