वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव नगरपरिषद समोर थाली बजाओ आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  शेवगाव नगर परिषदेस दिलेल्या लेखी निवेदनास अनुसरून शेवगाव नगर परिषद स्थापनेपासून आजपर्यंत शहरातील व्यवसायीकांनी जी नियमबाह्य बांधकामे केली त्या धनदांडग्यांच्या  नियमबाह्य बांधकामांची चौकशी करून सदरची बांधकामे निष्कासित करावी या मागणी करिता आज गुरुवार दि २० रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात जोरदार  बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी शेवगाव नगर परिषदेचे निष्क्रिय अधिकारी तसेच मनमानी, अरेरावी करणारे अधिकारी विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

  या प्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, अरूण झांबरे पाटील,ऑगस्टीन गजभीव, राजू आहुजा, विजयकुमार शहाणे, भगवान भागवत सर,रवींद्र निळ, शेख सलीम जिलाणी, सागर गरुड, सुरेश जाधव, प्रमोद गजभीव, शेख नबीभाई, बाळासाहेब साळवे, दिपक गायकवाड, संजय निकाळजे, अनिल चव्हाण, सचिन पिपंळे, ज्ञानेश्वर ताकवाले, अनिल काळे, कैलास धुमाळ, सोमनाथ ढाकणे, विशाल फलके, अन्वर सय्यद यांच्यासह सागर फडके नगरसेवक शब्बीर शेख व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवगाव नगर परिषदेने नगर परिषद स्थापन झाल्या पासून ची सर्व व्यावसायिक बांधकामाची सखोल चौकशी करून परवानगी देतांना ज्या अटी आणि शर्ती नगर परिषणने घालून दिलेल्या आहेत त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली नसेल त्यांची चौकशी करून ती नियमबाह्य ठरवून निष्काशीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने  आंदोलन तात्पुरते  स्थगित करण्यात आले.

Leave a Reply