संजीवनीच्या पाच विद्यार्थ्यांची जेएनके इंडिया कंपनीत निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २६ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नाने जेएनके इंडिया लिमिटेड कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील पाच विद्यार्थ्यांची आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे.

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने आपल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्यामध्ये दमदार कामगिरी सिध्द केली आहे, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

     जेएनके इंडिया लिमिटेड या उष्णता  प्रणालीवर आधारीत मशिनरी उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने श्रेयश सतीश  थोरात, ऋषिकेश अशोक  कुमावत, प्रसाद दादासाहेब टुपके, प्रतिमा ऋषिकेश  बोगा व ज्ञानेश्वर  देविदास थोरात यांची निवड केली आहे. विविध कंपन्यांची उत्पादने काय आहेत, तेथे कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते.

संबंधित कंपन्यांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कसे भविष्य  आहे व त्यांच्या करीअरची कशी चांगली प्रगती होईल, इत्यादी सर्व बाबींचा विचार व अभ्यास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रशिक्षणासह  व्यक्तिमत्वाचे पैलुही रूजविले जातात. कंपनीचे प्रतिनिधी मुलाखतींना येण्याच्या पुर्वी टी अँड  पी विभागाने विद्यार्थ्यांकडून मुलाखतींचा भरपुर सराव करून घेतला होता. त्यामुळे कंपनीला आवश्यक  असणारे पाच विद्यार्थी सहजरित्या नोकरीसाठी निवडले गेले.

        संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या पाच विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. प्रसाद पटारे व टी अँड  पी प्रमुख डॉ. विनोद तिडके उपस्थित होते.

Leave a Reply