पालीकेने पकडले २९ मोकाट वळूसह १६ गायी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगाव शहरातील सर्व रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी ठाण मांडून बसत असल्याने नागरीकांचं जगणं मुश्कील झाले आहे. शाळकरी मुलांसह अबाल वृध्द आपला जीव मुठीत धरून शहरात फिरत आहेत. नागरीकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेवून मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे निरीक्षक सुनील आरण व त्यांच्या समवेत पालीकेतील कर्मचाऱ्यांनी शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरु केली आहे.

आत्ता पर्यंत तब्बल २९ वळूसह १६ मोकाट गायींना पकडून तालुक्यातील कुंभारी, मंजूर तसेच संगमनेर येथील गोशाळेत त्यांची रवानगी करण्यात आल्याची माहिती आरोग्य निरीक्षक सुनिल आरण यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, शहरात अंदाजे दोनशे मोकाट गायी व वळू संबंधीत मालकांनी सोडून दिले आहेत. काही नागरीक प्राणी माञावर दया  म्हणून चारा टाकतात याचाच गैरफायदा घेत काही लोकांनी आपल्या ताब्यातील गायी जाणुनबुजून शहरात मोकाट सोडल्या. गायी बरोबर काळी वळू आहेत ते रस्त्यावर झुंडीने फिरतात काही वेळात त्यांच्यात भांडणे होतात तेव्हा भररस्त्यात त्यांच्या मारीमारी करतात तेव्हा रस्त्यावरून ये-जा  करण्याच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या आदेशाने आरोग्य विभागाच्यावतीने मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरु केली आहे. आठ दिवसांत ४५ मोकाट जनावरांना पकडून विविध गोशाळा मध्ये पाठवण्यात आले आहे. हि मोहीम लागु पाठ सुरु ठेवल्यामुळे येत्या काही दिवसांत शहर   मोकाट जनावरमुक्त होईल. तसेच मोकाट कुञे व इतर सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालीका प्रशासन सज्ज झाली आहे, असेही आरण यांनी सांगितले.

दरम्यान सध्या कोपरगाव तहसिल कार्यालयाच्या मुख्य दरवाजा समोर मोकाट जनावरांच्या झुंडी उभ्या असल्याने शासकीय कामासाठी आलेल्या नागरीकांना तहसील कार्यालयात जाताना अडथळा निर्माण होत आहे. काही मोकाट जनावरांनी थेट तहसील कार्यालयात घुसुन तिथेच धुडगूस घातल असल्याने नागरीकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.

रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या गायी व वळु कितीही हाकलण्याचा प्रयत्न केला तरीही उठत नसल्याने नागरीकांना नाईलाजास्तव रस्ता बदलुन दुसऱ्या रस्त्याने जावे लागते. मोकाट जनावरांच्या ञासाने कोपरगावचे नागरीक मेटाकुटीला आले आहेत. पालीकेने मोकाट जनावरांची धरपकड सुरु केल्याने थोडा दिलासा मिळत असल्याची भावना नागरीकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply