कोल्हे कारखान्याचा कार्य गौरव सतत वाढवावा – देवराम देवकर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी साखर कारखान्याची कामधेनु निर्माण केली, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी तिच्या उत्कर्षात भर घातली तर युवानेते विवेक कोल्हे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तिचा नांवलौकीक देशपातळीवर वाढविण्यासाठी काम करत आहे तेंव्हा कामगारांनी कोल्हे कारखान्याचा कार्य गौरव सतत वाढवावा असे प्रतिपादन सहायक लेखापाल देवराम देवकर यांनी केले.

 सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा शाखेचे कर्मचारी रंजन परजणे व रोखपाल दिनकर बोरनारे प्रदिर्घ सेवेतुन निवृत्त झाले त्यांचा विशेष लेखा परिक्षक डी. एन. पवार यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रांरभी उप मुख्य लेखापाल प्रविण टेमगर यांनी प्रास्तविक करून त्यांच्या कार्याची माहिती दिली.

 सत्कारास उत्तर देतांना रंजन परजणे म्हणाले की, कोल्हे कुटूंबियांनी संजीवनी कारखान्यात काम करण्याची संधी दिली त्या ऋणांतुन उतराई होवु शकत नाही. दिनकर बोरनारे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सभासद शेतकरी व कामगारांच्या उत्कर्षासाठी सात दशके अविरत संघर्ष केला.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत येथील साखर कारखानदारी टिकुन राहण्यांसाठी विशेष परिश्रम घेतले तर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे आधुनिकतेचा ध्यास बाळगत कारखान्यासह त्यावर अवलंबुन असलेल्या सर्व संस्थांच्या प्रगतीत योगदान देतात. त्यांनी कामगार या नात्यांने आमच्या प्रत्येक सुख दुःखात साथ दिली आहे.

याप्रसंगी संगणक विभागाचे चंद्रकांत जाधव, विधीज्ञ किरण म्हस्के, वाल्मीक कळसकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी लेखा विभागाच्या सर्व कर्मचा-यांसह वसंत थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी वाल्मीक कळसकर यांनी आभार मानले.

Leave a Reply