कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : आपण डॉक्टर असल्याचा कोणताही अहंकार नाही तर डॉक्टर असल्याची जाणिव मनात बाळगून आपल्या हाॅस्पिटलमध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णांवर माफक दरात योग्य औषधांची माञ देवून घरातल्या माणसाप्रमाणे रुग्णांची सेवा करणारे डॉ. रविंद्र गायकवाड हे देवदूताची भूमिका बजावत आहेत.

रुग्णांचे देवदूत म्हणून डॉ गायकवाड परीचीत आहेत. डॉ. गायकवाड यांनी करोनाच्या कठीण व भयावह काळात शेकडो बाधीतांना आपला जीव धोक्यात घालुन करोनामुक्त केले. काळ वेळ न पहाता अहोराञ वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर म्हणून डॉ. गायकवाड यांच्याकडे पाहीले जाते. तिथे गेलेला रुग्ण शंभर टक्के बरा होवूनच येतो असा विश्वास जनमानसात आहे. डाॅ.रविंद्र गायकवाड हे हृदय रोग तज्ञ, डायबॅटोलाॅजिस्ट व जनरल फिजिशियन आहेत. त्यांचे सर्व आधुनिक सुविधा नियुक्ती प्रशस्त एसी , नाॅन एसी रुम सह अद्यावत हाॅस्पिटल आहे.

अतिदक्षता विभाग, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम व्हेंटिलेटर, काॅम्प्युटराईज्ड ईसीजी,सेंट्रल माॅनिटरिंग पॅरामाॅनिटरींग सिस्टम, इन्फ्युगन पंपसह अनेक सुविधा असल्याने येथे हृदय रोग, उच्चरक्तदाब,अॅलर्जी विषबाधा, सर्पदंश, मधुमेह, दमा, अस्थमा, क्षयरोग छातीचे विकार, पॅरलेसिस, मेंदू रोग, लिव्हर किडनीच्या आजार थायरॉईड ग्रंथीचे आजार संसर्गजन्य आजार यासह अनेक आजारांवर उपचार योग्य उपचार करण्याची खास सुविधा डॉ. गायकवाड यांच्या हाॅस्पिटलमध्ये असल्याने कोपरगाव शहरातील एक नामवंत हाॅस्पिटल म्हणून डॉ. गायकवाड यांच्या हाॅस्पिटलचे नाव घेतले जाते.

डाॅ. गायकवाड यांच्या मितभाषी स्वभावामुळे रुग्णांना धीर मिळतो व अभ्यासपूर्वक निदान करण्याच्या हातोटी ते रुग्णांच्या आजारांवर मात करण्यात यशस्वी होतात. रुग्णां बरोबर त्यांचा थेट संवाद होतो. दिलासा देणारी बोली भाषा असल्याने रुग्णाचा निम्मा आजार बर होतो अशी चर्चा नागरीकांमध्ये असते. बदलत्या वैद्यकीय क्षेञात काम करत असताना डॉ. रविंद्र गायकवाड यांनी वैद्यकीय सेवा बदलली पण मनातला माणुसभाव कधी बदलला नाही. त्यांनी रुग्णांच्या सेवेतच माणुसकीचा धर्म जपत असल्याने ते खऱ्या अर्थाने माणसातला देव माणुस म्हणजे डॉ. रविंद्र गायकवाड आहेत.
