समृद्धी महामार्गावर ६५ लाखांचा गुटखा जप्त

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : समृद्धी महामार्गावर धडाकेबाज परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांनी आपल्या पथकासह वेषांतर करून केलेल्या कारवाईत एका आयशर वाहनातून तब्बल ६४ लाख ८० हजार रुपयांचा राज्यात बंदी असलेला गुटखा, सुगंधी पानमसाला पकडला. पोलिसांनी आयशरसह तब्बल ७६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. आरोपी अकिल रमजान शेख रा. आदिलाबाद, तेलंगाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने गुप्त माहितीच्या आधारे परिविक्षाधीन उपधीक्षक संतोष खाडे यांनी आपल्या पथकासह समृद्धी महामार्गावरील कोपरगाव-शिर्डी इंटरचेंजवर सामन्य नागरिकांप्रमाणे गस्त घालत सापळा रचला. संशयित आयशर ट्रक क्रमांक एमएच ४६ बीबी ८०९८ हा समोरून येताना दिसला. या वाहनाची खाडे यांनी तपासणी केली असता कायद्याने बंदी घातलेला दोन प्रकारचा गुटखा व सुगंधी पान मसाला त्यात मिळून आला. 

या आयशरमधील काही माल हा अहिल्यानगर तर बाकी उर्वरित माल हा भिवंडी, मुंबई येथे जाणार होता. पोलिसांनी वेळीच  कारवाई केल्याने गुटखा रॅकेटचालकांचे धाबे दणाणले आहे. आयशर मध्ये एकूण ६४ लाख ८० हजाराचा अवैध रित्या व विक्रीसाठीचा गुटखा मिळून आला. अकिल शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कारवाई सुरु होती.

सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अशीच कारवाई यापुढे हि अवैध धंद्यांविरुद्ध कोपरगावसह जिल्ह्यात सुरूच राहील असे माध्यमांशी बोलताना परिविक्षाधीन पोलीस  उपाधीक्षक संतोष खाडे म्हणाले. या सर्व कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा या प्रकरणात कारवाई केल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply