कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या कोपरगांव तालुकाध्यक्षपदी अनिल हरिभाऊ सोनवणे यांची नुकतीच निवड झाली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी नाशिक येथील बैठकीत अनिल सोनवणे यांना हे नियुक्तीपत्र प्रदान केले.

अनिल सोनवणे हे संवत्सर येथील रहिवासी असुन माळी समाजाच्या उत्कर्षासाठी ते गेल्या ३० ते ३५ वर्षापासुन कार्यरत आहेत. युवकांसह ज्येष्ठांच्या प्रश्नाची सोडवणुक करण्यांत नेहमीच सहभाग देतात. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, ज्ञानेश्वर परजणे, बापुसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश परजणे, उपाध्यक्ष संदीप गुरुळे, संभाजीराव बोरनारे, महेश परजणे, मुकुंद काळे आदि उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देतांना अनिल सोनवणे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी माळी समाजाबरोबरच मतदार संघातील इतर सर्व समाज घटकांना बरोबर घेत विकासात्मक कार्यात नेहमीच सहभाग दिला आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे व युवानेते कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शनांखाली कार्यरत राहुन तालुक्यात माळी समाज महासंघाचे संघटन वाढविण्यांवर भर देवु. शेवटी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले. अनिल सोनवणे यांच्या निवडीबददल तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
