आत्मा मालीक हॉस्पिटलमध्ये 996 आजारांवर मोफत उपचार

१ जुलै पासुन रूग्णांच्या सेवेत २४ तास सुरू

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : गेल्या दोन ते अडीच वर्षापासुन बंद असलेले आत्मा मालिक हॉस्पिटल गुरू माऊलींच्या कृपा आर्शीवादाने गुरूपौणर््िामेच्या मुर्हतावर 1 जुलै पासुन पुन्हा एकदा रूग्णांच्या सेवेत दाखल होत आहे. अशी माहिती आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी आत्मा मालिक ट्रस्टचे सरचिटणी हणुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाष भट, गिरमे साहेब, बाळासाहेब गोर्डे, व्यवस्थापक सुधाकर मलिक, हॉस्पिटल मुख्य कार्यकारी व्यवस्थापक डॉ. अविनाश पवार, डॉ. नितीन पाटील, डॉ. अनिकेत सोनवणे, डॉ. कुंदन गायकवाड आदी उपस्थित होते.

अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी पुढे म्हणाले की, मागील काही वर्षामध्ये तंात्रिक कारणामुळे आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये रूग्णसेवा खंडीत झाली होती. आलेल्या अडचणींवर मात करून विश्वात्मक जंगली महराज आश्रम ट्रस्ट स्वतः हे हॉस्पिटल चालविणार असल्याने रूग्णांची होणारी गैरसोय थांबणार आहे. नागरीकांना तत्पर आरोग्य सेवा देता यावी यासाठी आश्रम प्रशासनाने 18 बेडचे अद्यायवत आय.सी.यु विभाग, लहान मुले, नवजात बालकांसाठी 18 बेडचे एन.आय.सी. यु  विभाग तसेच सुसज्ज ऑपरेशन थेअटर, रूग्णंासाठी मोफत अॅम्बुलंस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

गुडघे, खुबे प्रत्यारोपणासाठी अडीच ते तीन लाख रूपये खर्च येतो परंतु आत्मा मालिक हॉपिस्टल मध्ये निम्म्या खर्चामध्येच हा उपचार होणार आहे. तर नवजात बालकांसाठी पुर्णपुणे मोफत उपचार केले जाणर असुन एन्जोप्लास्टी, एन्जोग्राफी सारखे ऑपरेशन मोफत होणार आहे. ज्या नागरीकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल त्यांना 996 आजारावर तर आयुष्यमान भारत कार्ड धारकांना 1209 आरांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहीती आत्मा मालीक हॉस्पिटलचे सीईओ डॉ. नितीन पाटील यांनी दिल.

दरम्यान पत्रकार हा 24 तास समजाच्या समस्या मांडण्यात व्यस्त असतो परंतु पत्रकारांच्या आरोग्याची काळजी कोणी करीत नाही. त्यामुळे आत्मा मालीक हॉस्पिटलने नगर जिल्हयातील प्रिंट मिडीय व डिजिटल मिडीयामधील सर्व पत्रकार व वर्तमानपत्राच्या कार्यालयातील काम करणारे सर्व कर्मचारी यांचेसाठी ‘आत्मामालिक आरोग्य सुरक्षा योजना’ गुरूपौर्णिमेपासुन सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये कोणत्याही आजारावर शासकीय योजना वगळुन 25 हजार रूपयांपर्यतचा उपचार खर्च स्वतः आत्मा मालिक ट्रस्ट व आत्मा मालिक हॉस्पिटल प्रशासन करणार असुन त्यापुढील होणाÚयार खर्चावर 50 टक्के सुट देण्यात येणार आहे.

यामध्ये पती, पत्नी, दोन मुले किंवा मुली, आईवडील यांचा समोवश आसणार आहे. सदर योजनेमध्ये 1 वर्षभर मोफत उपचार होणार आहेत. 1 जुलै 2023 पासुन  ते 7 जुलै 2023 पर्यंत सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत सर्व रोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन सर्व पत्रकार बांधवानी या याजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आत्मा मालिक ट्रस्ट व आत्मा मालिक हॉस्पिटल प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे. तसेच येत्या काळात भाविकांसाठी विविध आरोग्य योजना चालु करण्याचा मानस आहे. तर चांदेकसारे, कोकमठाण व कोपरगाव या गांवाच्या शिवेवर हे हॉस्टिल असल्याने या गावाच्या नागरीकांसाठी देखिल मोफत आरोग्य सेवा देणार असल्याचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले.