संजीवनीचे आठ विद्यार्थी इंटर्नशिपसाठी रशियाला रवाना

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : संजीवनी युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनी युनिव्हर्सिटीतील एमबीए, बीबीए, बी.टेक. व एम एससीच्या एकुण आठ विद्यार्थ्यांना रशियाच्या नामांकित उरल फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये पंधरा दिवसांच्या इंटर्नशिपसाठी मार्गस्थ झाले आहेत. त्यांच्या समवेत ‘फॅकल्टी एक्सचेंज’ उपक्रमांतर्गत इंटरनॅशनल विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी हे सुध्दा रशियाला गेले आहे.

उरल फेडरल युनिव्हर्सिटी व संजीवनी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झालेला असुन या कराराचे हे फलित आहे. सर्वाचा विमान प्रवास खर्च, राहणे व जेवण उरल फेडरल युनिव्हर्सिटी करत आहे, अशी  माहिती संजीवनी विद्यापीठाच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

रशियाला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये खुश हिंमत पटेल, राघवेंद्र विजय नायडू, अनिकेत उदय धामणे, आर्या दिनेश  कुंटे, ध्रुव श्रीकांत सोनी, ईश्वरी श्रीकृष्णा  पवार, ऋषिका रमेश  उंडे व वैणवी नितिन निकुंभ यांचा समावेश  आहे. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी इंटर्नशिपसाठी (अंतर्वासिता) सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी व्हाईस चांसलर डॉ. ए.जी. ठाकुर, डायरेक्टर डॉ. एम.व्ही नागरहल्ली, डीन्स डॉ. कविथा राणी, डॉ. समाधान दहिकर, डॉ. माधुरी जावळे, डॉ. विनोद मालकर, डॉ. देवयानी भामरे, डॉ. महेंद्र गवळी, इत्यादी उपस्थित होते.

 सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना अमित कोल्हे म्हणाले की, तुम्ही रशियामध्ये केवळ संजीवनीचेच नव्हे तर भारताचे प्रतिनिधी आहात. संपुर्ण जगाला भारताविषयी आदर आहे. रशियाच्या विद्यापीठातील नियम समजावुन घेवनु त्यांचे काटेकोर पालन करा. तेथिल प्राद्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जे प्रोजेक्टस् कराल, ते मन लावुन करा. असे प्रोजेक्टस् तुमच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणार आहे. तेथिल विद्यार्थ्यांना मित्र म्हणुन जोडा. सध्याच्या काळात बहुतांशी कंपन्या आपला सामाजिक संपर्क (सोशल नेटवर्किंग) तपासतात. चांगल्या प्रकल्पामध्ये आपण कसे समरस होतो, हे महत्वाचे आहे. इंटर्नशिप करून परत आल्यावर इतर विद्यार्थ्यांना तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचे, तेथिल इतर बाबींची माहिती द्या.- अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी      

Leave a Reply