कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : आमदार आशुतोष काळे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेरणा फाउंडेशनचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ॲड. मनोज कडू बोलतांना म्हणाले की, आमदार आशुतोष काळे हे खरे कोपरगावचे जलदूत असून त्यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवला आहे.

यावेळी डॉ. गलांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक खान सर, मोकळ ताई आदी मान्यवरांची भाषणे झाली. उपस्थित प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. मनोज कडू, डॉ. तुषार गलांडे, मुकुंद इंगळे, फैजल मन्सूरी, समीर मणियार, राजेश वालझडे, शाळेचे मुख्याध्यापक मुबाशीर खान, रियाना अहमद सैय्यद मॅडम, पुजा वाकचौरे, ज्योती गोरे, उज्वला विस्टे, प्रद्या पगारे, शोभादेवी मोकळ, जयश्री गायकवाड, मीरा सोळसे, नुरीन शेख, रोजमीन शेख, सीमा पठाण, सुलताना शेख, पुनम नेटारे, तृप्ती लोलप, आबेदा खाटिक, खुशबू खाटिक आदी प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.
