कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरु

  १५ प्रभागातून निवडले जाणार ३० सदस्य

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नव्याने प्रभाग रचना करण्यात आली असुन पुर्वीच्या १४ प्रभाता नव्या एका प्रभागाची निर्मीत झाल्याने आता १५ प्रभाग झाले आहेत तर  प्रत्येक प्रभागातून  २ सदस्य निवडले जाणार असुन सदस्य संख्या २८ वरुन ३० झाली आहे. शहराच्या हद्दवाढीमुळे नवीन एक प्रभाग वाढला आहे तर उर्वरित पुर्वीचे १४ प्रभागाच्या परिसराची व्याप्ती जैसे थे आहे. नव्याने प्रभाग संख्या व सदस्य संखेंची निश्चित प्रारूप मसुदा  कोपरगाव नगरपालीका प्रशासनाने तयार केला आसल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.

२०१६ च्या निवडणुकीत कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीतील १४ प्रभाग करण्यात आले होते. त्यात २८ सदस्यांची निवड करण्यात आली होती. मात्र आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नव्याने १ प्रभागाची वाढ करून १४ ऐवजी १५ प्रभाग करण्यात आले आहेत. एका प्रभागातून दोन सदस्यांना निवडणून द्यायचे असल्याने एकूण सदस्य संख्या ३० करण्यात आली आहे. पूर्वीच्या १४ प्रभागाची जी व्याप्ती आहे ती तशीच असून नव्याने निर्माण झालेल्या प्रभागाला क्रमांक एक देण्यात आला आहे.

नवीन प्रभाग क्रमांक १ ची व्याप्ती पुढील प्रमाणे  आहे – ब्रिजलाल नगर, ओमनगर, सह्याद्री कॉलनी, कर्मवीर नगर, दुल्हनबाई वस्ती, शंकर नगर, अयोध्या नगरी, गवारे नगर, आढाव वस्ती, गिरमे सिटी, रुई वस्ती, देवकर वस्ती, आदीं नगरांचा समावेश असून प्रभाग एक मध्ये एकूण मतदार ४२८५ असून अनुसूचित जातीचे ७५८, अनुसूचित जमातीचे १४२ मतदार असलेला हा प्रभाग नव्याने निर्माण करणण्यात आला आहे.
प्रभाग क्र २ ची व्याप्ती पुढील प्रमाणे –  खडकी पूर्व, पश्चिम, शिंदे शिंगी नगर, सुखशांतीनगर, समता नगर, रेणुका नगर, क्षीरसागर, काळे वस्ती, टिळेकर वस्ती, बोरावके वस्ती, आदींसह नगर मनमाड रस्त्या पर्यंत ते शिंगणापूर हद्दी पर्यंत व्याप्ती आहे. या प्रभाग क्र दोनची मतदार संख्या ४४२६ त्यात अनुसूचित जाती ९४६ , अनुसूचित जमाती १३९ आहे.

प्रभाग क्र. ३ ची व्याप्ती पुढील प्रमाणे –  श्रीरामनगर, विद्यानगर, आढाव वस्ती, गिरमे वस्ती, जानकी विश्व, रिद्धी सिद्धी नगर, नरोडे चाळ, सप्त सरोवर, सुभद्रानगर, संपूर्ण निवारा, मंगल मूर्ती टॉवर, नरोडे वस्ती पासून गोदावरी पेट्रोल पंप पर्यंत टाकळी रोड कॉर्नर पर्यंत व्याप्ती असून प्रभागाची मतदार संख्या ४२६७ त्यात अनुसूचित जातीचे २९४ अनुसूचित जमाती ७८ आहे.

प्रभाग क्र ४  व्याप्ती टाकळी रोड, बागडे हॉटेल परिसर, रेव्हेन्यू सोसायटी, हॉटेल स्पॅन मागील परिसर, हॉटेल अपना व हॉटेल इंद्रायणी परिसर, अण्णाभाऊ साठे चौक, साईबाबा तपोभूमी, काळे माळा सप्तर्षी माळा, सुख सागर सोसायटी, समता बँक परिसर, श्रम साफल्य गवंडी गल्ली, खाटिक गल्ली, बाजार तळ, नरोडे गल्ली, चांभार गल्ली, शिवाजी रोड, चौधरी वाडा , आनंद भवन परिसर, आदींचा समावेश असून प्रभागात एकूण मतदार ४५२४ असून त्यात अनुसूचित जाती ५३८ अनुसूचित जमाती १३८ आहे.

प्रभाग क्र ५ ची व्याप्ती येवला रोड, जुनी नगरपरिषद हद्द पूर्व बाजू , जगतार मोटार गॅरेज परिसर, कालिका, अंबिकानगर, अन्नपूर्णानगर, वडांगळे वस्ती, गरिमा नागरी, आधार पवार वस्ती, शारदानगर, बँक कॉलनी, एस एस जी एम महाविद्यालय परिसर, के बी पी विद्यालय, प्रभागातील एकूण मतदार संख्या ४९४० असून त्यात अनुसूचित जाती ८१३ अनुसूचित जमाती २१० आहेत.

प्रभाग क्र ६ ची व्याप्ती जबरेश्वर मंदिर परिसर, जिजामाता उद्यान परिसर, गोसावी मठ जुनी मामलेदार कचेरी, बिरोबां चौक, कापड बाजार, शिवाजी रोड, पगारे वाडा, तेली, झेंडे, धनगर, गवंडी, चांभार, कहार आदी गल्लींचा समावेश आहे. या प्रभागात एकूण मतदार ४६०४ असून त्यात अनुसूचित जाती १३१ ,अनुसूचित जमाती १६१ आहेत.

प्रभाग क्र ७ ची व्याप्ती धारणगाव रोड, कोयटे फ्रब्रीकेषण मागील परिसर, कृष्णाई मंगल कार्यालय परिसर, मोरे कॉम्प्लेक्स, सावता कृपा मंदिर परिसर, गुरुद्वारा रोड दक्षिण बाजू, पंचायत समिती कोर्टर, शिवाजीनगर, सहवास हौसिंग सोसायटी, राम मंदिर रोड, टिळकनगर, बँक रोड, गोदावरी पाईप कारखाना, शाळा क्र. सहा, भाजी मार्केट, दत्त बेकारी परिसर, गोदाम गल्ली, खैरे कॉम्प्लेक्स मागील परिसर, यशवंतचौक मागील परिसर, गांधी पुतळा, गिरमे चाळ, इदगा मैदान, शेतकरी बोर्डिंग परिसर, पॉवर होउस, गोखरूबाबा गल्ली, असा असून एकूण मतदार ४८८८ असून त्यात अनुसूचित जाती ५५३ अनुसूचित जमाती ७० आहेत.

प्रभाग क्र ८ ची व्याप्ती खंदकनाला, कचरू कोपरे यांच्या मागील परिसर, कांचन वाईन मागील, बस स्थानक मागील परिसर, खुले नाट्यगृह परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अन्कुटकर ईमारत, सावरकर उद्यान परिसर, धारणगाव रोड, सुभाष नगर मस्जिद गल्ली परिसर, सुभाष नगर सार्वजनिक शौचालय परिसर, बैल बाजार रोड, पूर्वे कडील पाणी टाकी परिसर असून प्रभागात एकूण मतदार ४६०६ असून त्यात अनुसूचित जातीचे १५८३ व अनुसूचित जमातीचे १४ मतदार आहेत.

प्रभाग क्र ९ ची व्याप्ती ख्रिश्चन स्मशानभूमी, टाकळी रोड, बौध्द विहार परिसर, टाकळी रोड, कोपरे मार्ग, कृषी मित्र सोसायटी, भगवती कॉलनी, यशवंत हौसिंग सोसायटी, इंदिरा पथ पूर्व बाजू, संजयनगर वडार गल्ली, एकूण मतदार ४८६२ असून त्यात अनुसूचित जाती १४३८ तर अनुसूचित जमाती ५१ आहेत.

प्रभाग क्र १० ची व्याप्ती सिद्धी विनायक कॉलनी, गंगोत्री सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, श्रम साफल्य सोसायटी, गोदावरी सोसायटी, गुलमोहर कॉलनी, जैन मंदिर परिसर, महावीर कॉलनी, ग्रामीण रुग्णालय, लक्ष्मी नगर पाण्याची टाकी उत्तर बाजू, झोपड पट्टी काही भाग, स्वामी समर्थ नगर, धारण गाव रोड, जोशी नगर, श्रद्धा नागरी, बोरावके वस्ती, जगदीश अपार्टमेंट बँक कॉलनी एकूण मतदार ४४३२ अनुसूचित जाती ३३१ अनुसूचित जमाती ६२ आहे.

प्रभाग क्र ११ ची व्याप्ती बालाजी नगर, लक्ष्मी नगर अर्धा भाग, चाळ, साईनगर, राम मंदिर मागील परिसर, विवेकानंद नगर, फादर वाडी, बोरावके चाळ, गिरमे वस्ती, इंगळे नगर, हनुमान नगर, कब्रस्थान पश्चिम भाग, वालझाडे व गोदावरी किराणा मागील भाग, एकूण मतदार ४४७७ असून त्यात अनुसूचित जातीचे ११२१ जमातीचे १६१ आहेत.

प्रभाग क्र १२ व्याप्ती आंबेडकर वसतिगृह शिलेदार ईमारत, नगरपालिका कर्मचारी ह्हौसिंग सोसायटी, गांधीनगर, एस जी विद्यालय मागील, महादेवनगर काही भाग, गांधीनगर मस्जिद जवळ परिसर, अंबिका चौक, खडा गल्ली वैष्णवी देवी मंदिर जेऊर रोड, एकूण मतदार ४४१० असून त्यात अनुसूचित जाती २०३ अनुसूचित जमातीचे ११७ मतदार आहेत.

प्रभाग क्र १३ ची व्याप्ती, चितळे दुकानामागील परिसर, इंदिरा नगर, खेडकर पोथीवाल, वायकर, मन्सुरी,जानेफळ  गल्ली, हनुमाननगर रोड जवळील भाग, क्रब्स्थान पूर्व बाजू  एकूण मतदार ५०६६ त्यात अनुसूचित जाती ६११ जमाती १७४ आहेत.

प्रभाग क्र १४ व्याप्ती, मजीद अत्तर घर मागील, खडा गल्ली, दत्तनगर पूर्व, गोरोबा नगर, महादेव मंदिर दक्षिण ,इनडोअर गेम हॉल, गोरोबा नगर पूर्व बाजूं इंद्गा मैदान, गजानन नगर परिसर, मतदार संख्या ४४१५ असून त्यात अनुसूचित जाती ६४० जमाती १६० आहेत.

प्रभाग क्र १५ ची व्याप्ती, हरिजन कॉलनी, कोर्ट रोड, मौलवी गंज, पोलीस वसाहत, चर्च, लीम्बारा मैदान, मोहनीराज नगर, बेट वस्ती, मोहनीराज नगर वसाहत, शिंदे आढाव वस्ती, केजे सोमैया महाविद्यालय परिसर, तांडेल बंगला, कातकाडे, रुईकर, हत्तीवले वस्ती, नगर मनमाड हाय वे एकूण मतदार संख्या ५०३५ असून अनुसूचित जाती ९७८ जमाती २४२ आहेत.     

कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना तयार केलेला नकाशा पालीकेच्या कार्यालयात लावला आहे. तो प्रभाग निहाय असुन नागरीकांना बघता येतो तसेच ज्या नागरीकांच्या प्रभाग रचना संदर्भात  काही हरकती व सुचना असतील त्यांनी आजपासून ३१ ऑगस्ट पर्यंत पालीकेकडे मांडाव्यात त्यांच्यावर एक निश्चित तारीख ठरवून निकाली काढण्यात येणार आहेत. – मुख्याधिकारी, सुहास जगताप

Leave a Reply