कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर, कोपरगाव तालुका क्रीडा समिती व कोपरगाव तालुका तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20/08/2025 रोजी तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धाचे आयोजन तालुका क्रीडा संकुल कोपरगाव येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगावच्या 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या गटातून ओंकार राजेंद्र शिंदे याने 45 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला तर मुलींच्या गटातून पूर्वा रामदास घाटे व स्तुती सुभाष त्रिभुवने या दोघींनी अनुक्रमे 65 व 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या तीनही खेळाडूंची निवड जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहिल्यानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी दिली.

या खेळाडूंच्या यशाबद्दल को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे ,सचिव संजीव दादा कुलकर्णी, प्र.प्राचार्य डॉ. व्ही .सी. ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ. सुनिल कुटे, कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना समिती चेअरमन डॉ.डी एस.बुधवंत सर, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
