कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : चालु वर्षी मे महीण्यापासुन पावसाला दमदार सुरुवात झाल्यामुळे ऑगस्ट महीण्याच्या शेवटी नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणं काठोकाठ भरली असुन मुख्य म्हणजे नगर नाशिक जिल्ह्यातील नागरीकांची चिंता वाढवणारे जायकवाडी धरणही शंभर टक्के भरले आहे.

एकट्या गोदावरी नदीपाञातुन आत्तापर्यंत तब्बल ६२ टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात जावून विसावले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण परिसरात अजुनही पाऊस सुरु असुन गोदावरी नदीतून ६ हजार ३१० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने जायकवाडी धरणाच्या दिशेने आजूनही पाण्यात विसर्ग सुरुच आहे.

दरम्यान जायकवाडी १०० टक्के भरल्याने मराठवाड्यातील तीनशे खेड्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. नाशिक धरण परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने जुलैच्या पहील्याच आठवड्यात ५३ टक्के पाणी साठा झाला होता. मध्यला काळात पावसाने दडी मारली होती माञ ऑगस्ट मध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि नाशिक जिल्ह्यातील भाम, भावली, वालदेवी, आळंदी, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, केळझर व हरणबारी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

दारणा – ९५.८६ , मुकणे – ९८.०४ टक्के, वाकी – ९१.५७ टक्के, गंगापूर – ९७.१० टक्के, कश्यपी – ९९.४१ टक्के, गौतमी – ९८.०२ टक्के, कडवा – ९५.५० टक्के, भोजापूर – ९५.८४ टक्के, पालखेड – ८९.२८ टक्के, करंज्या – ८४.१० टक्के भरले आहे. सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे नगर नाशिक सह मराठवाड्यातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील धरण परिसरातील उपलब्ध पाणीसाठा ९६.३७ टक्के इतका आहे. यावर्षी सर्वञ पाणीच पाणी झाल्याने वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
