प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांना ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : कोपरगाव येथील संशोधक मार्गदर्शक व महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचालित कला विज्ञान व वाणिज्य
महाविद्यालय सुरगाणा जिल्हा नाशिक येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांना रिसर्च इंडिया फाउंडेशन, भुवनेश्वर, ओडिसा, इंडिया या नामांकित संशोधन संस्थेकडून २ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ‘बेस्ट टीचर अवॉर्ड २०२३’ प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार डॉ. गायकवाड यांना English Language and English Literature या क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव कामगिरी बद्दल विशेषतः शैक्षणीक कार्य, संशोधन कार्य, प्रभावी अध्यापन, विद्यार्थी समुपदेशन, प्रात्यक्षिक आधारित नाविन्यपूर्ण शिक्षण व वैयक्तिक मार्गदर्शन याबाबत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रिसर्च इंडिया फाउंडेशन, भुवनेश्वर, ओडिसा, इंडिया या संशोधन संस्थेचे संस्थापक व चेअरमन प्रा. डॉ. राजेंद्र कुमार दाश यांनी डॉ. कमलाकर गायकवाड
यांचे अभिनंदन केले. डॉ गायकवाड यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक या संस्थेचे अध्यक्ष, सचिव, ट्रस्टी व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अरुण पाटील, उपप्राचार्य प्रा. विजय अहिरे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.एस.एम.भोये व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ गायकवाड यांचे अभिनंदन केले. डॉ गायकवाड यांचे कुटुंबीय व मित्र परिवार यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.