कोपरगाव न्यायालयाने जुबेर तांबोळीला सुनावली ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : जिल्हा व सत्र न्यायाधीश कोपरगाव डी. डी. आलमले यांचे न्यायालयात आरोपी जुबेर फारूक तांबोळी ता. शेवगाव यास कोपरगाव भादवि कलम ३०७ अन्वये ७  वर्ष तुरुंगवास आणि ५ हजार  रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव न्यायालयातील सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिंगणापुर ता.कोपरगाव शिवारात संजीवनी इंजिनीयरींग कॉलेजचे अवारातील सिक्युरीटी ऑफीस समोर लेडीज हॉस्टेल जवळ दि.१० एप्रिल २०१५ रोजी गुन्हा घडला होता. यातील आरोपी जुबेर फारुख तांबोळी रा.शेवगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर याने इंजिनीयरींग कॉलेज मध्ये जाऊन बाळासाहेब मुक्ताहरी रोहम व भाऊसाहेब तुळशीदास वाघ यांना सांगितले की, मला मधील व्यक्तीला भेटावायाचे आहे.

आरोपीच्या सांगण्यावरून लेडीज हॉस्टेलचे वॉचमन दत्तु कारभारी पैठणकर यांनी मुलीस बोलावण्यास सांगितले.  आरोपीस पाहुन मला या मुलास भेटावयाचे नाही असे सांगुन मुलीने भेटण्यास नकार दिला व निघुन गेली तेंव्हा बाळासाहेब मुक्ताहरी रोहम व भाऊसाहेब तुळशीदास यांनी आरोपीस कॉलेज बाहेर जाण्यास सांगितले.

या कारणावरुन आरोपीस राग येऊन आरोपीने त्याचे जवळील चाकुने बाळासाहेब रोहम, भाऊसाहेब वाघ व दत्तु पैठणकर यांचेवर वार करुन गंभीर दुखापती करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. म्हणुन आरोपी विरुद्ध भादवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उप निरीक्षक  बी.बी.शिंदे  कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला आहे.                   

दरम्यान सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. सदर केसमध्ये काही साक्षीदार फितूर झाल्यानंतरही फिर्यादी व इतर साक्षीदार तसेच डॉक्टर व सी.ए अहवाल चा पुरावा ग्राह्य धरून आरोपीस ७ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. सदर केसचे कामकाज पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष माळी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केला असून आरोपींचे धाबे दणाणले आहे.

Leave a Reply