कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतुन व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला ४६ लाख २१ हजार रूपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष उत्तम भानुदास शेळके यांनी दिली.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीची ६१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संजीवनी कार्यस्थळावर सोमवारी पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक सुहास यादव बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी या परिसराचा सहकाराच्या माध्यमांतुन कायापालट केला.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी नविन तंत्रज्ञानावर भर देत सभासद, उस उत्पादक शेतकरी, कर्मचारी व साखर कामगार पतपेढीच्या सभासदांच्या उत्कर्षाला पाठबळ दिले. संस्था आपल्या प्रगतीच्या केंद्रबिंदु आहे त्याची सर्वांनी जपवणूक करावी. उपाध्यक्ष सुभाष होन यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत ७० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या १२ सभासदांच्या पाल्याचा रोख स्वरूपात बक्षिस देवुन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. संस्थेने यावर्षी सभासद कल्याण निधीतुन वैद्यकिय व मयत सभासदांच्या वारसांना १९ हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात सर्वानुमते मंजुर करण्यांत आले. व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले सभासदांनी ते कायम केले.

संस्थेचे भागभांडवल ८५ लाख २७ हजार रूपये असुन गुंतवणुक ८ कोटी १२ लाख रूपये आहे. मार्च अखेर संस्थेकडे ५ कोटी ५७ लाख रूपयांचे फंडस जमा आहेत. १३ कोटी ६३ लाख रूपयांच्या ठेवी असुन ११ कोटी ५५ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे.

या वार्षीक सर्वसाधारण सभेस साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, शेतकी अधिकारी एन. डी. चौधरी, संस्थेचे संचालक सर्वश्री. देवराम देवकर, साईनाथ तिपायले, सुरेश मगर, आण्णासाहेब पगारे, केशव बटवाल, सुदाम उगलमुगले, कारखान्यांचे सर्व पदाधिकारी, खाते प्रमुख, उप खातेप्रमुख, सभासद, संस्था कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन संचालक विलास कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष सुभाष होन यांनी आभार मानले.
