११७ सीबीएसई शाळा आणि ८०० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीच्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०२५ मध्ये वेगवेगळ्या वयोगटात शानदार प्रदर्शन करून सुवर्ण व रजत पदकांची कमाई करून स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. शिर्डी येथे झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील ११७ सीबीएसई शाळा आणि ८०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, या स्पर्धा इंडियन स्पोर्ट्स अँड फिटनेस फेडेरेशन घेतल्या, अशी माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

११ वर्षाखालील वैयक्तिक मुलींच्या वयोगटांतर्गत जोया झिया इंतखाब शेख हिने स्पोर्टस एरोबिक्स प्रकारात सुवर्ण पदक मिळविले. तर १७ वर्षाखालील सारानाझ झिया इंतखाब शेख हीनेही याच प्रकारत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ११ वर्षे वयोगटांतर्गत फिटनेस एरोबिक्स प्रकारात मुलींच्या संघाने रजत पदक मिळविले.

यात वीरा सुधिर गायके, शर्वरी अभिजीत देवकर, रूजुला योगेश खैरणार, जोया झिया इंतखाब शेख, ओवी किरण शिंदे , स्वरा मयुर मुंदडा, दुर्वा विशाल परदेशी व आर्या विशाल औताडे यांचा समावेश होता. देशभरातील ११७ शाळांसमोर संजीवनी अकॅडमीच्या खेळाडूंनी त्यांचे कौशल्य आणि टीम वर्क सादर करून सर्वोत्तम सादरीकरण केले.

या सर्व खेळाडूंचा संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी त्यांच्या पालकांसह सत्कार केला. यावेळी प्राचार्या शैला झुंजारराव, आदी उपस्थित होते. तसेच एरोबिक्स शिक्षिका निर्जला लक्ष्मण बारोकार यांचाही सत्कार करण्यात आला. संजीवनीच अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले.

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स किंवा एरोबिक्स हा स्पर्धात्मक खेळ असुन ज्यामध्ये जटिल, उच्च तीव्रतेच्या हालचालींचे नमुने सगीतासह सादर केले जातात. अशाही प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांना शिकविले जातात. त्यांचा सर्वांगीण विकास हा संजीवनी अकॅडमीचा ध्यास आहे. देश पातळीवरील हे मिळालेले यश हे त्यांच्या परीश्रम व समर्पणाचे प्रतिक आहे. तसेच स्कूल विविध उपक्रम राबवित असताना पालकांचे मोठे पाठबळ मिळते, ही स्कूलसाठी मोठी जमेची बाजु आहे. पालकांनी टाकलेला विश्वास सार्थ करणे यासाठी स्कूल कटीबध्द आहे.– डॉ. मनाली कोल्हे, संचालिका.
