कोपरगांव प्रतिनिधी, दि. ६ : ज्या राष्ट्राबद्दल आदर आहे उत्तरदायित्वाची जाणिव खर्या अर्थाने ठेवायची झाल्यास ज्या उद्देशाने संघाची स्थापना झाली त्या संघटनेचा एक अविभाज्य घटक होण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. सनातन असणारी आपली भारतीय संस्कृती या संघटनेमुळे आज विश्वामध्ये असणारे एकूण 48 संस्कृतींपैकी एकमेव आपली ही भारतीय संस्कृती ही जीवंत राहिली विश्वमान्य आहे त्याचा आपण प्रत्येकाने एक अविभाज्य घटक झाले पाहिजे असे प्रतिपादन आत्मा मालिक ध्यानयोग, ध्यानपिठाचे अध्यक्ष प.पू.संत परमानंद महाराज यांनी कोपरगांव येथे संघशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रा.स्व.संघ स्थापनेस 100 वर्ष पूर्ण होत असल्याने या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित पथसंचलन व शस्त्रपूजन कार्यक्रमात संत परमानंदमहाराज प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते या वेळी रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह दिपक जोंधळे तसेच तालुका संघचालक सुरेश विसपुते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व स्वयंसेवकांचे सघोष व पूर्ण गणवेशात पथसंचलन आंबेडकर मैदान डॉ. हेडगेवार चौक बाजारतळ सराफबाजार शिवाजी रोड सावरकर चौक टिळकनगर विघ्नेश्वर चौक अशा मार्गाने झाले यावेळी स्वयंसेवकांचे ठिकठिकाणी रांगोळया काढून, फुलांची उधळन करुन स्वागत करण्यात आले. सवाद्य निघालेल्या या पथसंचलनाने कोपरगांवचे लक्ष वेधले होते.

यावेळी बोलतांना परमानंद महाराज म्हणाले, या अखिल विश्वामध्ये भारत राष्ट्राला एका अलौकिक उंचीवर नेवून ठेवण्यामध्ये डॉ.केशव बळीराम हेडगेवार या महापुरुषाने आणि या महापुरुषाच्या निर्मितीने अनमोल असे शाश्वत योगदान दिले आणि तब्बल 100 वर्षापूर्वी 1925 साली आपल्या सनातन संस्कृतीमध्ये असणारा पराजयाकडून दिग्वीजयाकडे घेवून जाणारा अज्ञानाकडून शाश्वत ज्ञानाकडे घेवून जाणरा अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून जाणारा स्वयंप्रकाशाकडे घेवून जाणारा विजयादशमीचा पवित्र पावण असा सण या दिवशी रा.स्व.सेवक संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि निर्मिती ज्या महान पुरुषाने केली डॉ. केशव बळीराम हेडगेवार आज त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन या प्रसंगी करुन याच सरसंघचालकांच्या परंपरेमध्ये ज्या राष्ट्रभक्तांनी या भुमिसाठी तनमनधन वापरुन योगदान दिले जीवन समर्पित केले त्यांची स्मृती निश्चित केली पाहिजे.

आज 100 वर्षानंतरचा हा आयाम आपणा सर्व राष्ट्रीय नागरीकांना पहायला मिळाला व साक्षीभुत होण्याचा योग आला आणि आज ज्यांच्यामुळे सुखमय जिवन जगत आहोत अशा समस्त प्रभुतींची प्रज्वलता आज खर्या अर्थाने अनुभवत आहोत. खर्या अर्थाने राष्ट्रसेवेचा आयाम आहे, प्रारंभ आहे वास्तविक सनातन असणारी आपली भारतीय संस्कृती या संघटनेमुळे आज खर्या अर्थाने जीवंत राहिली म्हणून आज विश्वामध्ये असणारे एकूण 48 संस्कृतींपैकी एकमेव आपली ही भारतीय संस्कृती ही जीवंत राहिली विश्वमान्य आहे या संस्कृतीचा संस्कार स्वत:ही अंगिकारला एका विशिष्ट कार्यपद्धतीतून हा संस्कार जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी आपल जीवन अनुशासन जीवनपद्धतीत जगत असतांना त्यांनी समर्पित केल त्यातून जी संघटना, समरसता त्यातून जो माणुस घडला त्याच नाव आहे स्वयंसेवक.

अखिल विश्वामध्ये आपली भुमी ही एकमेव अशी आहे ज्या भुमिला आपण भारतमाता म्हणून संबोधतो या भुमीला या देशाला राष्ट्राला माऊलीची सदभावना तुमच्या आमच्या अंत:करणामध्ये जन्माला घालणारी आणि आणि त्या भावनेला आत्मियतेमध्ये परावर्तित करणारी जी संघटनात्मक जीवनशैली आहे त्या राष्ट्रभक्तीच त्या शैलीच नाव आहे रा.स्व.संघ असे त्यांनी शेवटी म्हटले. या प्रसंगी उत्तर जिल्हा कार्यवाह प्रा.दिपक जोंधळे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी संघाची सूर्यनमस्कारासह विविध प्रात्यक्षिके योगासने झाली.
