गोदावरी नदीवर साकारणार आणखी एक सेतू – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : एम.डी.आर असो किंवा नसो ग्रामीण मार्ग असो किंवा नसो ज्या ठिकाणी नागरिकांची पुलाची मागणी आहे ज्या ठिकाणी पूल करणे अत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी पूल उभारण्यास मंजुरी देण्याचा महत्वाचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे. मा.आ.अशोकदादा काळे यांनी गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी पूल उभारले त्यामुळे दळणवळण वाढले त्याचा फायदा अनेक गावांना झाला. धारणगाव-कुंभारी पुलामुळे संपूर्ण पश्चिम भाग कोपरगाव शहराला जोडला जावून कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलण्यास मोठी मदत झाली आहे.

मी देखील वारी तसेच इतर ठिकाणी पूल उभारले आहे. सगळे पूल झाले आहेत सुरेगावचा पूल मात्र राहिला आहे. त्यामुळे हा पुल उभारण्यासाठी माझे प्रथम प्राधान्य असून त्यासाठी कमीत कमी २५ ते ३० कोटी निधी आवश्यक आहे. त्याबाबत माझा पाठपुरावा पण सुरु आहे. निधी उपलब्ध होताच पहिल्या टप्यात सुरेगाव-सांगवी भुसार पुलाचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ०१ कोटी ५० लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. या विकास कामांमध्ये तलाठी कार्यालय व निकमनगर रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण तसेच दशक्रिया विधी शेड बनवणे,मोतीनगर स्मशानभूमी रस्ता करणे व स्मशानभूमी सुशोभीकरण करणे (टप्पा १ व २) आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचे भूमिपूजन आदी कामांचा समावेश आहे.

यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, स्व.कर्मवीर शंकररावजी काळे, मा.आ.अशोकराव काळे यांनी नेहमीच सुरेगावच्या विकास कामांना सर्वोतोपरी मदत केली आहे तोच वारसा मी पुढे चालवीत आहे. सुरेगावचे नागरीक नेहमीच सहकार्य करतात. २०१९ पूर्वी कोपरगाव शहराला २१ दिवसाआड पाणी येत होते. परंतु पाच नंबर साठवण तलाव पूर्ण झाल्यामुळे चार दिवसाआड पाणी येते त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावकरांनी मला भरभरून मतदान देतांना राज्यात क्रमांक पाचचे उंचांकी मतदान मिळाले यामध्ये सुरेगावचा पण मोठा वाटा आहे.

सुरेगावकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी विकास कामांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल हा माझा नेहमी प्रयत्न असतो. सुरेगावला एक स्मशानभूमी आहे, परंतु गावाचा मोठा विस्तार असल्यामुळे दुसऱ्या स्मशानभूमीची नागरिकांची मागणी होती ती मागणी पूर्ण केली. जलजीवन योजनेच्या कामातून तलावाचे काम होणे गरजेचे आहे त्यासाठी अधिकचा निधी आवश्यक असून त्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे त्याला सुरेगाव देखील अपवाद नाही त्यामुळे सातत्याने गटारीच्या पाण्याची अडचण निर्माण होते त्यामुळे या गटारीच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे हि काळाची गरज आहे.

कोपरगाव शहराला भूमिगत गटारीसाठी निधी आणला आहे त्याप्रमाणे सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी, शहाजापूर या गावांच्या भूमिगत गटारीचा प्रश्न एकत्रितपणे मार्गी लावून हे सर्व पाणी एका ठिकाणी आणून शेतीसाठी वापरता येईल का? हि नागरिकांची मागणी नसली तरी हा प्रकल्प यशस्वी करता येईल का? याची चाचपणी करू. सुरेगावच्या विकासासाठी जिल्हा परिषद, राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला व यापुढे पण देवू.

राज्य मार्ग ०७ देर्डे फाटा ते भरवस फाटा तालुका हद्द या रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे काही अडचणी येतील परंतु ज्यावेळी हा रस्ता पूर्ण होईल त्यावेळी भविष्यात हा रस्ता कित्येक दिवस करावा लागणार नाही एवढे भक्कम काम सुरु आहे. कोळपेवाडी-कोपरगाव या महत्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे हा रस्ता देखील सिमेंट कॉंक्रीटचा करावा लागणार आहे त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगत आ.आशुतोष काळे यांनी सुरेगावसह पंचक्रोशीतील गावांच्या विकासाचा मास्टर प्लॅन यावेळी उपस्थित नागरीकांपुढे मांडला त्यावेळी नागरीकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

यावेळी परमपूज्य श्री गोवर्धनगिरीजी महाराज, शिवाजीराव वाबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, सुरेगावच्या सरपंच सौ.सुमनताई कोळपे, उपसरपंच सीमाताई कदम, तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिकआप्पा कोळपे, माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब, गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे, पद्मविभुषण शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, सुदामराव वाबळे, गौतम कुक्कुट पालनचे संचालक सुशिल बोरावके, माजी सरपंच शशिकांत वाबळे, यशवंत निकम,अंबादास धनगर,डॉ.आय.के.सय्यद, प्रशांत वाबळे, माजी उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, नामदेव कोळपे, सुहास वाबळे, भागवत कदम, सिद्धार्थ मेहेरखांब, पांडुरंग ढोमसे, श्रीधर कदम, हेमंत वाबळे, गणपत गोरे, मोतीराम निकम, अरुण लोंढे, रवींद्र देवकर, संजय ढोणे, माणिक उगले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.                       

Leave a Reply