आपण निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ :  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही. आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात परंतु आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे. तो वसा आणि वारसा पुढे चालवत असतांना आजपर्यंत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच जिल्ह्यात चांगला दर देण्याची परंपरा जपली आहे आणि याहीवर्षी ऊस दराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. 

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या वर्षाच्या ७१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने १ नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नाही मागील सहा महिन्यापासून पाऊस सुरु असून आजही ऊसाच्या शेतात पाणी साचलेले असून सुरुवातीस साखर उतारा हा कमीच राहणार आहे. शेतातील ऊस पिकाची वाढ चांगली झाल्याचे दिसून येत असले तरी पाऊस व वादळाने ऊसाचे पिक पडलेले अशा परिस्थीतीत टनेजमध्ये वाढ झाल्यास उद्दिष्टापेक्षा जास्त गाळप करता येईल. मात्र चालू हंगामात साखर उतारा कसा मिळतो त्यावरच साखर उत्पादन अवलंबून राहणार आहे.

 कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस असा भेदभाव कधीच केलेला नाही. मागील वर्षी गाळपास आलेल्या कार्यक्षेत्रावाहेरील ऊसाला देखील कार्यक्षेत्राप्रमाणेच ३१००/- रुपये दर दिल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांचा सत्कार केला यावरून याहीवर्षी कारखान्याला कार्यक्षेत्राबाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस मिळणार आहे.

चालू वर्षी सर्वच ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला असून  विहिरीच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व के.टी. वेअर व बंधारे पाण्याने पुर्ण भरलेले आहे. गोदावरी कालव्यांनाही हमखास ४ ते ५ रोटेशन मिळतील असा अंदाज आहे. या सर्व परिस्थीतीमुळे तसेच कांदा व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन केले.

साखर निर्यात झाल्यास शेतकऱ्यांना चांगला दर देता येतो.मागील वर्षी केंद्र शासनाने १० लाख में. टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले होते मात्र प्रत्यक्षात ८ लाख मे.टन साखर निर्यात होवू शकली चालू वर्षी मागील वर्षी पेक्षा १८ टक्के साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे साखर उत्पादनाचा आढावा घेवून केंद्र शासनाने कायमस्वरुपीचे साखर निर्यात धोरण घ्यावे अशी मागणी देखील आ.आशुतोष काळे यांनी केद्र शासनाकडे केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहण्याची कर्मवीर शंकरराव काळे यांची परंपरा डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त गाळप करून हा हंगाम यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

 पुढचा काळ निवडणुकीचा असून तयारीला लागा आपण विजय मिळवणारच आहे. विरोधकांनी चाळीस वर्ष सत्ता भोगूनही त्यांच्याकडे दाखवायला काहीच नाही. मंजूर बंधारा बांधला, हिंगणी बंधारा बांधला याचं कौतुक करतात परंतु आज त्या बंधाऱ्यांची काय परिस्थिती आहे. मंजूर बंधारा दुसऱ्यांदा फुटला त्यावेळी तो बंधारा आपल्या कारखान्याकडे देखभालीसाठी हस्तांतरित करावा यासाठी कारखान्यामार्फत दोनदा पत्रव्यवहार केला मात्र राजकीय कमीपणा येईल या भीतीपोटी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी जे व्हायचे तेच झाले हा बंधारा एवढा वाहून गेला की, त्यासाठी मला निधी मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. काम मोठे असल्यामुळे याहीवर्षी त्या बंधाऱ्यात पाणी अडविता आले नाही याचे मला दु;ख आहे मात्र पुढील वर्षी अडविता येईल. त्यामुळे उगाचचं खोट बोलायचं आणि नागरीकांना नादी लावायचं काम विरोधकांकडून सुरु असल्याचा टोला आ.आशुतोष काळे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता लगावला

       याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते छबुराव आव्हाड, विश्वासराव आहेर, नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे,बाबासाहेब कोते,आनंदराव चव्हाण, संभाजीराव काळे, संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, शंकरराव चव्हाण, सचिन चांदगुडे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, अनिल कदम,दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, प्रशांत घुले,सौ.इंदूबाई शिंदे, सौ.वत्सलाबाई जाधव, गंगाधर औताडे, श्रावण आसने, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केनचे कार्यकारी संचालक सुभाष गवळी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,

जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे,उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक पदाधिकाऱ्यांसह सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे यांनी केले.सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कारखान्याच्या ऊस विभागाकडून एकरी शंभर टन ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शक पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply