कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : ज्या जनतेने तुम्हाला विकास कामे करण्यासाठी निवडून दिले त्याच जनतेला अपेक्षित असलेली विकास कामे होवू नये म्हणून तुम्ही विकासकामांना स्थगिती मिळावी यासाठी न्यायालयात गेले. आ.आशुतोष काळे यांनी हि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरु करताच तुम्ही शेपूट घालून माघार घेतली. तुम्ही विकासावर बोलून आ.आशुतोष काळेंवर टीका करने म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी विवेक कोल्हे यांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देतांना केली आहे.

यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे यांनी देखील कोल्हेंच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी सुनिल गंगुले यांनी विरोधकांचे आरोप म्हणजे खोट बोल पण रेटून बोल असे आहे, कोपरगांवचे नांव धुळगाव त्यांच्याच काळात झाले. २०१९ नंतर सगळे रस्ते आ.आशुतोष काळे याई केले. त्यांच्या काळात पाणी प्रश्न का सुटला नाही?

ज्याप्रमाणे संगमनेर, राहाता बस स्थानकाच्या बाजूने व्यापारी संकुल बाधण्यात आले त्याप्रमाणे कोपरगाव बस स्थानकाच्या बाजूने व्यापारी संकुल का उभारले नाही अस प्रश्न उपस्थित करून कोपरगावची जनता कायम पाण्यापासून वंचित रहावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. व्यापारी संकुल झाल्यावर लोकांचा प्रश्न सुटला तर आपल्याकडे कुणी येणार नाही त्यामुळे व्यापारी संकुल होवू दिले नाही. जनतेने कायम यांच्या दारात हेलपाटे मारायला हवे अशी त्यांची मानसिकता आहे. हे कोपरगावकरांना कळून चुकले आहे.

याउलट आ.आशुतोष काळे यांनी निधी दिलेल्या बस स्थानकाच्या व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्यात आहे,नगरपरीषदे समोर व्यापारी संकुलाचे काम सुरु आहे.पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत, न्यायालय, न्यायाधीश निवास, उपजिल्हा रुग्णालय या इमारती कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आहे. गोर गरिबांची शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी मा.आ.अशोकराव काळे यांनी आय.टी.आय.कॉलेज इमारत उभारली. परंतु २०१४ ते २०१९ या काळात आपल्याला श्रेय मिळणार नाही या भीतीपोटी त्या इमारतीला पुढील कामासाठी त्यांनी निधी दिला नाही असे ज्यांचे विचार आहेत त्यांच्याकडून कोपरगाव करांच्या विकासाच्या अपेक्षा संपलेल्या आहेत.

चुकीचे आरोप करायच्या अगोदर तुमच्या लोकांनी ह्या रस्त्यांचे काम केले आहे त्यांना अगोदर विचारा. चुकीचे काम तुमच्याच लोकांनी करायचे, भ्रष्टाचार तुमच्याच लोकांनी करायचा आणि तुम्ही आरोप आ.आशुतोष काळेंवर करायचे. कोपरगाव शहराच्या नागरीकांना पाणी मिळू नये यासाठी वकिलांची फौज उभी करायची आणि रस्ते होवू नये म्हणून न्यायालयात जायचे अशा लोकांना घरी बसवा.राज्य शासनाकडून निधी मिळविण्यासाठी आ.आशुतोष काळे भक्कम आहेत मात्र नगरपरिषदेची सत्ता आवश्यक आहे. कोपरगावच्या नागरीकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागे उभे रहावे असे आवाहन करून आ.आशुतोष काळेंवर टीका करू नका अन्यथा सगळ्या पद्धतीने आमची उत्तर द्यायची तयारी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा दिला आहे.

माजी नगरसेवक मंदार पहाडे हे म्हणाले की, केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेवून आ.काळेंवर बिनबुडाचे आरोप केले त्यात तथ्य नाही.चाळीस वर्षापासून निवडणुका आल्यावर कोल्हे पाणी प्रश्नावर राजकारण करून आम्ही इकडून पाणी देवू, आम्ही तिकडून पाणी देवू असे सांगून जनतेची दिशाभूल करीत होते.कोपरगावची जनता सुज्ञ झाली असून कोल्हेंना चाळीस वर्षात सत्ता असतांना व कोपरगाव नगरपरिषदेत नेहमीच त्यांचे सर्वात जास्त नगरसेवक असतांना त्यांना साधा पाणी प्रश्न सोडवता आला नाही.आ.आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करतांना निवडून आल्या नंतर दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या कामाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात केली.

मात्र विकास कामांना खोडा घालण्याचा हा विरोधकांचा स्वभाव असल्यामुळे एका बाजूने आम्हाला कोपरगावच्या नागरीकांची काळजी असल्याचे दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला पाच नंबर साठवण तलावाच्या कामात छुप्या पद्धतीने विरोध करुन आपल्या कार्यकर्त्यांच्या नावे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटूच नये असे मनसुबे रचायचे अशी कोल्हेंची दुतोंडी भूमिका आहे. परंतु आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावत कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. विकास कामांना खोडा घालायचा हा त्यांचा स्वभावच आहे.अजून पाच नंबर साठवण तलावाबरोबर एक ते चार नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण होवून सर्व साठवण तलावांची क्षमता वाढेल त्यावेळेस कोपरगावकरांना नियमितपणे रोज किंवा दिवसाआड पाणी मिळणार आहे.

यावेळी विरेन बोरावके यांनी विरोधकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून चार वर्षात आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगांव शहराचा विकास करण्यासाठी अनेक ठिकाणी व्यापारी संकुले बांधली. नुकतेच एका व्यापारी संकुलासाठी बाजारतळात भुमिपूजन झाल्याचे सांगतांना कोपरगांव शहराची भरभराट व्हावी म्हणून व्यापारी सकुलाची निर्मिती केली. विरोधक आ.काळेंवर आरोप करतात परंतु त्यांच्या काळात बस स्थानकाचे बांधकाम कशा पद्धतीने झाले हे जनतेने पाहिले आहे सदरचे बांधकाम म्हणजे केवळ दूरदृष्टी नसलेल बांधकाम करुन नागरीकांची मोठी गैरसोय निर्माण केली आहे आयटीआय कॉलेज, न्यायालयीन इमारत, निवासस्थान, ग्रामिण पोलीस स्टेशन इमारत, कर्मचारी वसाहत तसेच शहरातील अनेक समाजाला भरीव निधी दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली

विरोधकांनी आ.आशुतोष काळेंनी सामाजिक सभागृह न बांधल्याची टिका केली त्याचा राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी चांगलाच समाचार घेतांना, कृष्णा आढाव म्हणाले की, ज्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला ते त्यांच्या सोबत आहेत, ज्यांनी जलतरण तलाव खाल्ला, साईगाव पालखी रस्ता खाल्ला, ४२ कोटीची पाणी योजना खाल्ली ते भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मात्र कोपरगावची जनता सुज्ञ आहे त्यांना माहित आहे काम करणारा माणूस कोण आहे आणि खोटं बोलणारा कोण आहे. त्यामुळे येणाऱ्या कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत आ. आशुतोष काळे नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी जे उमेदवार देतील त्यांना जनता निवडून देईल.

कोपरगाव शहराच्या इतिहासात सामाजिक सभागृहासाठी कोणत्याही आमदारांनी निधी दिलेला नाही. मात्र मा.आ.अशोकराव काळे यांनी दिलेला आहे. त्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी त्याची व्याप्ती वाढवून समाजातील प्रत्येक घटकासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी निधी दिला आहे, यामध्ये मुस्लीम, शिंपी, ब्राम्हण, चर्मकार, तेली,बौद्ध, मराठा अशा प्रत्येक समाजाला निधी दिला आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसर्या टप्यासाठी देखील निधीची तरतूद आ. आशुतोष काळे यांनी केली असून प्रशासकीय मान्यता मिळून निविदा प्रक्रिया बाकी आहे तो प्रशासनाचा अधिकार असून निवडणुक आटोपताच ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

लोकप्रतिनिधीचे काम हे निधी द्यायचे असते काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. नगरपालिकेत गैरकारभार झाला त्याला आमदार काळे जबाबदार कसे? असा सवाल करुन सत्ता बहुमत तुमचेच होते कामे करुन घेण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. येथुन मागे असा आरोप कां झाले नाही असा सवाल करतांना त्यांनी विरोधक हे आमदारांना बदनाम करण्यासाठी बिन बुडाचे आरोप करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

