काळे गटात निष्ठावंतांना न्याय नसल्याने दिली सोडचिठ्ठी – शेजवळ

काळे गटाला दणका, शेजवळ यांचा भाजप प्रवेश 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ऐन रंगत येत असताना उमेदवार निश्चित होताच भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष आघाडी यासह कोल्हे कुटुंबावर विश्वास अधिक स्पष्ट झाला आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संतोष अर्जुन शेजवळ, रोशन प्रभू शेजवळ, जगदीश संतोष शेजवळ, जय संतोष शेजवळ यांचा रेणुका कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, भाजपा शहराध्यक्ष व प्रभाग क्रमांक १चे उमेदवार वैभव आढाव, कलविंदरसिंह दडीयाल, कल्पेश नरोडे, गुरमीतसिंग दडीयाल, उमेश गोसावी, अनुप पटेल, नवनाथ खोकले, हरिभाऊ गिरमे, मनोज निलक, प्रताप जोशी, तुषार सरोदे, नवनाथ खोकले, कैलास सोमासे, आबा जपे, नाना भुजबळ, बोळीज सर, अमर नरोडे, दीपक जपे, मारुती जपे, सुनील शर्मा, दीपाताई गिरमे, नंदकुमार गायकवाड, भाऊसाहेब आढाव, शिल्पाताई रोहमारे, सुनिताताई डहाळे, सुनिताताई शितोळे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

आम्ही गेले कित्येक वर्षे आमदार काळे यांच्यासोबत प्रामाणिक काम केले पण ऐनवेळी उमेदवारी देण्याची वेळ येताच आमच्यावर अन्याय झाला. तिथे निष्ठेला किंमत नसून किमतीला निष्ठा मोजली जाते की काय अशी आमची भावना झाली आहे. अशी तीव्र प्रतिक्रिया शेजवळ बंधूनी यावेळी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कोल्हे गटात सर्वांना सामावून घेत न्याय दिला जातो आणि कार्यकर्त्याची कदर होते असे शेजवळ म्हणाले आहेत.

काळे गटावर नागरिकांची वाढलेली नाराजी आणि कोल्हे यांच्यावर असलेल्या जनतेचा विश्वास यातून अनेकांची कोल्हे गटात प्रवेश करण्यासाठी तयारी झालेली आहे. भाजपा व मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील असे वातावरण असल्याचे हे संकेत आहेत असे यावेळी पराग संधान म्हणाले. कोल्हे कुटुंबावर आपण विश्वास ठेवत प्रवेश केला यातून निश्चितच मोठे यश आपल्याला मिळण्यासाठी सर्वांची सामुहिक शक्ती एकजूट झाली आहे. आपले पक्षात स्वागत आहे असे रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या.

Leave a Reply