पैशाच्या वादातून तरुणाचा खून 

कोपरगाव प्रतिनिधी, ११ : प्लॉटच्या व्यवहाराचे उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून तालुक्यातील डाऊच खुर्द येथे चार जणांनी संगनमत करून  एकाला लाकडी दांडे, चाकू मारून जीवे ठार मारल्याची घटना घडली. अस्लम शहाबुद्दीन सय्यद( वय 35 ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सदरची  घटना बुधवार दि. 10 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली.

 या प्रकरणी आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजीज शेख, परवीन मुनीर शेख, फिरोज मुनीर शेख, साहिल मुनीर शेख (सर्व रा. खडख वसाहत, डाऊच खुर्द ता. कोपरगांव) यांच्या विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

यासंदर्भात रफीक शहाबुददिन सय्यद यांनी  शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की, आरोपी  यांनी यातील मयत अस्लम शहाबुद्दीन सय्यद यास प्लॉटच्या व्यवहाराचे उसने पैसे मागणीतल्याच्या कारणावरून संगमनाने शिवीगाळ करून लाथ्याबुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपी साहिल मुनीर शेख याने चाकूने मयत यास मारण्याचा धमकी देऊन मयताच्या छातीवर ठिकठिकाणी डोक्यावर, कानाजवळ, चाकू मारले. तसेच आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजीज शेख  याने लाकडी दांडक्याने हाणमार करून जिवे ठार मारून टाकले आहे. तसेच साक्षीदार सोडविण्यासाठी गेले असता त्यास आरोपी फिरोज मुनीर शेख  याने विटाने तोंडावर मारून जखमी केले. 

आरोपी परवीन मुनीर शेख याने मयताची पत्नी हीस लाथ्याबुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजीज शेख याने तीस लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असल्याचे म्हटले आहे. त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे.

Leave a Reply