राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी केली नदीची स्वच्छता

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व  भारदे हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने ‘पुनीत सागर ‘अभियाना अंतर्गत वरूर येथील नंदिनी  नदीची स्वच्छता करून प्लास्टिक मुक्त भारत जनजागृती करण्यात आली.

Mypage

      देशातील जलस्त्रोत प्रदूषण मुक्त व प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘पुनीत सागर ‘  अभियानांतर्गत  येथील न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज व भारदे हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांनी सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, ऍडम ऑफिसर रणदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुक्यातील वरूर येथे ‘पुनीत सागर ‘ अभियानांतर्गत जलसाक्षरता व जलस्वच्छता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नदी काठी जमा झालेला प्लॅस्टिक कचरा व इतर ओला कचरा जमा करुन नदीची स्वच्छता करण्यात आली.

Mypage

    यावेळी  माजी सरपंच भागवत लव्हाट, मुख्याध्यापक घुले, मोरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. नदीकाठी होणारे विविध कार्यक्रम व त्यातून  होणारा प्लास्टिकचा कचरा यामुळे जलप्रदूषणाचे वाढते संकट दूर करण्यासाठी अशा उपक्रमाची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.  छात्र सैनिकांनी वरूर गावातून जलसाक्षरता रॅली काढली व प्लास्टिक मुक्त भारत करण्याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.  कॅप्टन भाऊसाहेब शिंदे व लेफ्टनंट नारायण गोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Mypage