जीवंत जनावराची कत्तल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ :  तालुक्यातील बोधेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने बोधेगाव दूरक्षेत्राच्या पोलिस कर्मचार्याच्या मदतीने गुरुवारी सकाळी घातलेल्या छाप्यात अंदाजे १५० किलो गोमांस व गोवशीय जनावरे कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ३० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्दे माल हस्तग करण्यात आला.

गोपनिय शाखेचे पोहे कॉ संतोष शंकर लोढे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून इस्माईल अलिमियाँ कुरेशी (वय ६०), छोटु अब्बास शेख (वय ४०) दोघे रा खाटीक गल्ली, बोधेगाव यांचे विरुद्ध राज्यात गोवंशी जनावराची कत्तल करण्याची मनाई असतांना गोवशीय जातीचे जीवंत जनावराची कत्तल करून मांस विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे जवळ सापडल्याने महापशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चे सुधारित २०१५ कलम ५ क, ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या मोहिमेत स.फ़ौ भाऊसाहेब काळे, पोना संदीप चव्हाण, पोकॉ शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, बोधेगाव दूर क्षेत्राचे पो.ना सुखदेव धोत्रे, इश्वर गर्जे सहभागी झाले होते. सहाय्यक फौजदार राजू ससाणे अधिक तपास करत आहेत.