शेवगावात भाजपाने केला पवारांचा निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपमानजनक बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते, अजित पवारांचा शेवगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील क्रांती चौकात  जाहीर निषेध करण्यात आला.

     यावेळी  भा.ज.पा. प्रदेश सचिव  मनोज पांगरकर, जिल्हाध्यक्ष अरुण  मुंढे, अहमदनगर शहर संघटन सरचिटणीस अॅड विवेक नाईक, या जिल्हा पदाधिकाऱ्यांसह  शेवगाव तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, उपाध्यक्ष उमेश धस, महिला अध्यक्ष आशाताई गरड, रवींद्र सुरवसे, बापूसाहेब पाटेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ माळवदे, तालुका सरचिटणीस भीमराज सागडे, उषाताई कंगनकर, कमलताई खेडकर,

जिल्हा ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष अशोक गाढे, माजी नगरसेवक दिगंबर काथवटे, फडके, कमलेश गांधी, नितीन दहिवाळकर,  गणेश कोरडे,  अंकुश कुसळकर,  भाऊसाहेब मुरकुटे, संजय खेडकर, शरद चाबुकस्वार, रामकिसन महाराज तापडिया, बाबू सावळकर, शिवाजी आधाट, गंगाधर खेडकर, अप्पासाहेब दारकुंडे, भास्कर भागवत, जगन्नाथ भागवत, सुनील जगताप , अंकुश  ढाकणे आदिंच्या उपस्थितीत अजित पवारांचा जाहीर निषेध करण्यात आला.