गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चार आरोपीसह २८ लाखाचा मुद्देमाल ताब्यात

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३ :  कोपरगाव तालुक्यात अवैध गॅस विक्री करणारी टोळी पोलीसांनी गजाआड केली. एलपीजी गॅसचा अवैधरीत्या काळाबाजार करणाऱ्या टोळीचा नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपीं विरुद्ध विविध कलाम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गॅस टंॅकर, दोस्त वाहन व गॅसचे इतर साहित्य असा २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई तीन जानेवारी रोजी रात्री साडे बारा वाजता जेऊर कुंभारी शिवारात एका ढाब्यासमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली.  

बुधा राम आनंदराम विष्णोई (४० )रा. जम्भ सागर, भीयासार जोधपुर राजस्थान, प्रकाश भगीरथरामजी विष्णोई (३५)रा. भिनासार, तहसील फलोडी, जोधपुर, राजस्थान, भुराराम कोजाराम जानी (२६)रा. भारजासार, तहसील फलोडी जोधपुर, राजस्थान, धर्मेंद्रकुमार बचानु बिंद (२७) रा. बिंद, थाना किरकत, जोनपूर राजस्थान, सुखराम मगन्नाराम विष्णोई रा.राजस्थान असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस हवालदार शकील शेख (नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली असून त्यात म्हंटले कि, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (मुंबई) या कंपनीमधून एल पी जी गॅसने भरलेले कप्सूल टंॅकर वाहन क्र. एमएच ४३ बी जी ७१५० वरील चालक धर्मेंद्र बिंद याने टंॅकर नेमुन दिलेल्या स्थळी नेला.

तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात आरोपीनी संगनमत करून सदर टंॅकर मधील गॅस विविध साधन साहित्यांचा वापर करून अवैधरित्या दुसऱ्या छोट्या टंॅकर व व्यावसायिक सिलेंडर मध्ये काढून घेऊन भरताना व साठवणूक करताना मिळून आले. पोलिसांनी गॅस टंकर व अशोक लेलंड कंपनीचा दोस्त वाहन एम एच ११ सी एच ४४८० व साहित्य ताब्यात घेतले आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक भरत दाते यांनी घटनास्थळी भेट दिली.