महिला मतदारांचा टक्का वाढावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच गुलाबी सखी मतदान केंद्र- स्नेहलता कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ : महिला ही नारी शक्ती आहे, मात्र अलिकडच्या काळात तिच्यावर सातत्याने अत्याचाराच्या घटनात वाढ होत आहे, महिलांना निर्भयपणे शासकीय-निमशासकीय संकल्पनेत सहभाग देता यावा यासाठी देशाच्या निवडणुक आयोगाने लोकसभा-विधानसभा निवडणुकीत संपुर्ण भारतभर गुलाबी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवून महिलामध्ये त्यातून जनजागृती केली होती.

त्याच धर्तीवर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही कोपरगांव तालुक्यात मौजे शिंगणापूर आणि माहेगांव देशमुख येथे गुलाबी रंगाचे सखी मतदान केंद्र रविवारी उभारण्यात आले असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, सौ रेणुका विवेक कोल्हे यांनीही सखी मतदान केंद्र संकल्पना जाणून घेतली.

तालुका निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विजय बोरूडे यांनी सखी गुलाबी मतदान केंद्र संकल्पना विषद केली. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, दौलतराव जाधव यांनी शिंगनापुर, माहेगांव देशमुख सह २४ ग्रामपंचायतीच्या मतदान संरक्षण पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली. शिंगणापुर येथील मतदान केंद्राधिकारी तथा तलाठी संदीप लहाने यांनी उपस्थीतांचे स्वागत केले.

कोल्हे पुढे म्हणाल्या की, देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मु, कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध योजना देशपातळीवर राबवत आहेत. देशाची आर्थीक घडी सुरळीत करण्यांत अर्थमंत्री निर्मला सितारामन काम करत आहेत. नारीशक्ती जबाबदारीतून घेते भरारी, तालुक्यात महिला बचतगट चळवळ सध्या मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. दिल्लीत मुली-महिलांवर अत्याचार होतात ते कमी करण्यासाठी निर्भया संकल्पना देशभर राबविली जात आहे.

महिला आपल्या कामात कुठेही मागे नाही. ती जबाबदारीच्या जाणिवेतून तिच्याकडे सोपवविलेले कार्य नियमीत पार पाडत असते. ग्रामपंचायत सत्तेची दोरी आता अनेकठिकाणी महिलांच्या हाती आहे, तेंव्हा महिलांनी आपल्या गावाचा विकास यशस्वीरिया साकारून तालुकापातळीवरील महिलांच्या अडी-अडचणी, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. गुलाबी सखी मतदान केंद्र आणि येथे असलेले निर्भय वातावरण नक्कीच २८ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेत महिलांचा टक्का निश्चित वाढेल असा सार्थ विश्वास सौ. कोल्हे यांनी शेवटी व्यक्त केला.

याप्रसंगी सरपंच सौ. सुनिता संवत्सरकर, भिमा संवत्सरकर, संजय तुळस्कर, शिवा सुपेकर, मंगेश गायकवाड, मुन्नाभाई पठाण, मोरे ताई, लाडताई, दरवडेताई यांच्यासह पाच बुथवर पंचवीस महिला मतदान पदाधिकारी, पाच महिला पोलीस अधिकारी, महिला बचतगट सर्व भगिनी, आदि मोठ्या संख्येने उपस्थीत होते. शेवटी भिमा संवत्सरकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे यांनी केले. शिंगणापूर पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनींनी या सखी मतदान केंद्राचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. दिवसभर या मतदान केंद्रावर महिलांचे लक्षणीय गर्दी होती.