सगळे वाळूचोर विरोधकांकडे म्हणून त्यांच्याच पायाखालची वाळू संपली  – विवेक कोल्हे

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : आमच्या पायाखालची वाळू घसरली किंवा संपली असे विरोधक आमच्यावर बोलतात, पण सगळे वाळू चोर त्यांच्याकडे असल्यामुळे वाळूच शिल्लक नाही. विकासाच्या मुद्यावर आम्ही जनतेसाठी विश्वासनामा घेवून आलोय त्यामुळे भाजप व मिञ पक्षाचे सर्व उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत असा टोला  विवेक कोल्हे यांनी पञकार परिषद घेवून आमदार आशुतोष काळे व काका कोयटे यांना लगावला.

 गुरुवारी दुपारी कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात पञकार परिषद घेवून माध्यमांसमोर बोलत होते. नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते योगेश वाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेवून भाजप व मिञ पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांना व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर करत युवानेते विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांचा योगेश वाणी यांनी सन्मान करुन पाठिंबा जाहीर केला.

यावेळी योगेश वाणी म्हणाले की, भाजपचा नगराध्यक्ष  व सर्व नगरसेवक निर्विवाद बहुमताने निवडून यावे ही संकल्पना माझ्या मनात असताना काही  नाट्यमय घडामोडीतून माझा अर्ज भरला होता. पण आता  मी माघार घेवून भाजपचे पराग संधान व नगरसेवक पदाच्या सर्व  उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी  प्रयत्न करणार आहे त्यांना माझा पाठींबा आहे. विवेक कोल्हे यांचा संकल्पाला मी कटीबद्ध असल्याचे सांगत वरिष्ठ पातळीवरील व स्थानिक पातळीवरील सर्व भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांचे आभार मानले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, योगेश वाणी हे भाजपचे हाडाचे कार्यकर्ते आहे, पक्षहितासाठी काम करणारा परिवार आहे. पराग संधान यांना वाणी यांनी पाठिंबा दिल्याने आपल्या नगराध्यक्षासह सर्वांचा विजय निश्चित आहे. कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत भाजप मिञ पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी सध्याचे वातावरण सकारात्मक आहे आपलाच विजय निश्चित आहे. अनेक कार्यकर्त्यांची इनकमिंगचा सिलसिला सुरुच आहे. येथे कमळ फुलवण्याची संधी वाणी यांनी दिली आहे.

दरम्यान आमची निवडणूक विकासाच्या मुद्यावर सुरु असुन  विरोधकामध्ये नैराश्य आलेले आहे. त्याच्यात अंतर्गत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कटकारस्थान त्यांच्यातच असल्याने लादलेला उमेदवार मान्य नसल्यामुळे त्यांच्यातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त होवून बोलत आहेत. त्यांचा पराभव अटळ झालेला आहे. विकासाच्या मुद्यावर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर समोरासमोर बोलायला कधीही तयार आहे.

आमदार आशुतोष काळे व काका कोयटे यांनी तारीख व वेळ सांगावी मी आमच्या सर्व उमेदवरांसह विकासाच्या मुद्यावरच काय झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा करायला तयार आहे. त्यांची हिंमत असेल तर विरोधकांनी येवून दाखवावे असे आव्हान कोल्हे यांनी केले.  यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, केशवराव भवर, विजय आढाव, योगेश वाणी, संतोष गंगवाल, तुषार पोटे, दिलीप दारुणकर, बाळासाहेब नरोडे आदींची उपस्थिती होती. 

Leave a Reply