सोमैयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी गिरवले आधुनिकतेचे धडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव तालुक्यातील वारी साकरवाडी येथील सोमैया विद्या मंदीर व  सावळी विहीर लक्ष्मीवाडी येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या  ग्रामीण भागातील  शेकडो विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट  डिझाईनचे प्रशिक्षण देवून बदलत्या जागाची तसेच आधुनिकतेचे धडे गिरवण्याची कला शालेय जीवनात शिकवून नव्या जगाची नवी ओळख करून देण्याचे महान कार्य सोमैया उद्योग समुहाचे अध्यक्ष समिर सोमैया हे करीत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून  मुंबईतील के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एआई-रोबोटिक सेलने तालुक्यातील  सोमैया यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना  रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट डिझाइनचे दोन दिवसीय प्रशिक्षण  दिले जात आहे. या उपक्रमाची संकल्पा घेवून प्रत्यक्ष प्रक्षिण देण्यासाठी खास मुंबई वरून आलेल्या समन्वयक डॉ. वैशाली वाढे  व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्सच्या नवनव्या उपक्रमाचे प्रात्यक्षिके दाखवून मुलांची बुध्दीमत्ता वाढवत नवव्या  तंञज्ञाणाची प्रत्यक्ष ओळख करुन देत हाताळण्याची कला शिकवत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हा अभिनव उपक्रम सोमैया ग्रुपच्यावतीने राबवून समाज कार्याला हातभार लावत आहे अशी माहीती यावेळी डॉ. वैशाली वाढे यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या  की, तालुक्यातील साकरवाडीच्या मातीत सन  १९४२ साली पद्मभूषण करमशी जेठाभाई सोमैया यांनी शिक्षणाचा पहिला दीप लावला होता. त्यातून जन्मलेल्या सोमैया विद्या मंदिराची परंपरा आज साधारण आठ दशके पार करूनही तेवढ्याच तेजाने उजळत आहे. या पवित्र वारशाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी मुंबईतील के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एआई-रोबोटिक सेलने शाळेतील विद्यार्थ्यांना  रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट डिझाइनचे दोन दिवसीय प्रशिक्षण दिले.या  उपक्रमामागे सोमैया विद्याविहार ट्रस्टचे अध्यक्ष समीर सोमैया यांची “ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञानाच्या दाराशी नेण्याची” दृष्टी ठामपणे दिसून येते.

ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञानाची सहज पोहोच हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण शाळांमध्ये रोबोटिक्सचे  प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमकणारी नवी स्वप्ने, हीच पद्मभूषण करमशी सोमैया यांना खरी शैक्षणिक आदरांजली आहे असेही त्या म्हणाल्या.

या प्रशिक्षणासाठी गोदावरी बायो रिफायनरी लिमिटेडचे संचालक सुहास गोडगे यांचे प्रोत्साहन मिळाले. तर सोमैया आय टी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेक सुन्नपवार यांचे  विषेश मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका सुनीता पारे यांचे सहकार्य लाभले.  या प्रशिक्षणामध्ये डॉ.वैशाली वाढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम विभागातील विद्यार्थी पुष्प मारू, केसा सय्यद, नव्या प्रभू, मंथन जंत्रे, अनंत जैस्वरा, अंशू मानिया आणि पल्लवी चावडा यांनी प्रशिक्षण देण्यामध्ये विशेष पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रशिक्षण दिले. 

Leave a Reply