विरोधक जितके डावपेच आखतील तितके मताधिक्य आमचे वाढणार – आशुतोष काळे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव नगरपालीका निवडणुकीत विरोधकांनी खालच्या पातळीवर जावून जितके डावपेच आखले तितके मताधिक्य आमचेच वाढणार आणि नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. समता पतसंस्थेच्या कारभारावर विरोधकांनी कितीही डावपेच आखले तरीही समताच्या पाठीमागे माझ्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार ठामपणे उभे आहोत असे म्हणत विरोधकांचा आमदार आशुतोष काळे यांची समाचार घेतला. 

 कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक समता सहकारी पतसंस्थेच्या कारभारावर सर्वबाजून टिका टिप्पणी होत असुन काही थकबाकीदार समताच्या विरोधात पञके काढून बदनामी करत असल्याच्या कारणावरून आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेदवार काका कोयटे व समताचे संचालक संदीप कोयटे यांनी समताच्या सभागृहात तातडीची पञकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले ,काका कोयटे सारखा भक्कम चेहरा कोपरगाव नगरपालीकेत विराजमान झाला तर विकास कामाला गती येईल म्हणून उमेदवारी त्यांना दिली. कोयटे यांच्यामुळे विरोधकांचा पराभव दिसु लागल्यामुळे  त्यांच्या विरोधात षडयंञ सुरु झाले आहे. पण हे  करणार  याची कल्पना मला पुर्वीच होती ती कल्पना कोयटेंना मी दिली होती.  कोयटेंची उमेदवारी जाहीर झाल्यापासून हि निवडणूक पुर्णपणे बदलली. विरोधकांनी माझ्यावर टिका करायचे सोडून काका कोयटेवर घसरत आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवाराचा पराभव त्यांना  दिसतोय.

विरोधक बदनामी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण हि निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. विरोधकांची खोडा घालण्याची प्रवृत्ती जनतेच्या लक्षात आली आहे. सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे, म्हणून मला आज फार काही बोलता येणार नाही. पण विजय आमचाच  निश्चित असल्याने विरोधक बिथरले आहेत. लोकामध्ये जाण्याऐवजी विरोधक डावपेच आखत आहेत परंतू जितके डावपेच आखातील तितके  मताधिक्य आमचं वाढणार आहे. असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता निशाणा साधून समता पतसंस्थेच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करीत समताच्या पाठिमागे आपण भक्कम असल्याचे सांगीतले. 

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे म्हणाले की,  विरोधकांनी आपल्या  बगलबच्चेंना बळीचे बकरे ठरवत आहेत.  आम्ही विरोधकावर टिका करीत नाही पण त्यांना समताची अॅलर्जी झाली आहे. हि निवडणुक समताची नाही तर  नगरपालीकेची निवडणुक आहे. केवळ आडथळे आणण्याचे काम आम्ही करीत नाही. स्व. काळे, स्व. कोल्हेंचे अलिखित तत्व होते ते कोणाच्याही संस्थामध्ये खालच्या पातळीवर जावून काम केले नाही.  किमान त्यांचा तरी आदर्श विरोधकांनी घ्यावा

  मी समताच्या थकबाकीदारांच्या आठवणीच्या कथा आपल्या पुस्तकात मांडणार आहे. २० टाॅप थकबाकीदारांबद्दल पुस्तक आहेत. आम्ही आजपर्यंत ठेवीदारांना महत्व दिले. ठेवीदारांचा तळतळाट समता घेणार नाही प्रसंगी थकबाकीदारांचा रोष पत्करावा लागला तरी चालेल. तेव्हा विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांचा सल्लागार चुकीचा आहे. आरोप करणाऱ्यांंचा बेत आगामी काळात पहाणार. राज्याच सहकार खातं  उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याच गटाकडेच आहे त्यामुळे आम्हाला चिंता नाही असेही शेवटी कोयटे म्हणाले. 

 दरम्यान समता पतस्थांच्या थकबाकीदारांनी केलेल्या विविध आरोपांना समताचे संचालक संदीप कोयटे यांनी विविध पुराव्यानिशी उत्तर देत आरोप करणाऱ्यांच्या सर्व कुंडल्या माध्यमांसमोर  मांडत अचनान समताच्या विरोधात आत्ताच थकबाकीदार कसे एकलटले त्यांना आत्ताच का जाग आली. त्यांना कोणी एकञ केले असे म्हणत निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनीच हे केले असल्याचा संशय व्यक्त करीत विरोधकावर निशाणा साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, समताचे संचालक आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

Leave a Reply